Lok Sabha Election 2024: कोणत्या मतदारसंघात कधी होणार मतदान? जाणून घ्या…

182
Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यामध्ये महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असलेल्या ४८ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यावेळी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली तसेच लोकसभा निवडणूक – २०२४ साठी कोणत्या दिवशी कुठे मतदान होईल आणि मतमोजणी कधी होईल, याविषयी या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. (Lok Sabha Election 2024)

लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिलपासून ७ टप्प्यात मतदान होणार आहे, तर ४ जूनला होणार निकाल जाहीर होणार आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक १९ एप्रिलपासून ७ टप्प्यात होणार आहे. मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी, सहावा टप्पा २५ मे रोजी आणि शेवटचा आणि सातवा टप्पा १ जूनला होणार आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र ५ टप्प्यांत होणार लोकसभा निवडणूक; जाणून घ्या कोणत्या मतदारसंघात कधी होणार मतदान)

यावेळी महाराष्ट्रातील निवडणुका देखील उत्साहवर्धक आहेत कारण या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकीय गणित खूप बदलले आहे. तेव्हा शिवसेना होती, पण आता त्याचे दोन भाग आहेत. त्याच वेळी, राष्ट्रवादीही दोन भागात विभागली गेली आहे. अजित पवारांच्या गटाला खऱ्या राष्ट्रवादीचा दर्जा मिळाला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,  राज्यातील ४८ पैकी ४१ जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या आहेत. भाजपाला २३ तर शिवसेनाला १८ जागा मिळाल्या आहेत. भाजपाने २३ जागा जिंकल्या होत्या. सत्ताधारी युतीने २०१४च्या निवडणुकीत ४२ जागा जिंकल्या होत्या. अशा प्रकारे भाजप-शिवसेना युती एका जागेने कमी झाली.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४ वेळापत्रक 

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ (उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.