lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील पेच लवकर सोडवला जाईल; जयंत पाटील यांची माहिती

शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा

125
lok Sabha Elction 2024 : महाराष्ट्रातील पेच लवकर सोडवला जाईल; जयंत पाटील यांची माहिती
lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील पेच लवकर सोडवला जाईल; जयंत पाटील यांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. (lok sabha election 2024)पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या संघटनेबाबत चर्चा केली. लोकसभेच्या (lok sabha election 2024) जागावाटपाच्या वृतांबाबत चर्चा झाली. राज्यात किती जागा जिंकू शकतो याची माहिती त्यांना दिली असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.
मुंबई येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकांच्या (lok sabha election 2024) बाबतीतला महाराष्ट्रातील पेच लवकरात लवकर सोडवला जाईल त्यासंदर्भात आदरणीय पवार साहेब व राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाली आहे असेही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी सांगितले. (lok sabha election 2024)
महाराष्ट्रात सापडत असलेल्या ड्रग्जसाठी सरकार जबाबदार 
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ड्रग्सच्या घटना घडल्या त्यावेळी सरकारला जबाबदार ठरवण्यात आले. पुण्यात ज्यावेळी छापेमारीत ड्रग्सचे साठे सापडले आहेत त्यावेळी वर्णन काय तर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणाने ड्रग्स पकडले. यावेळी सरकारची जबाबदारी नाही? आज महाराष्ट्रात ड्रग्सचा सूळसुळाट आहे व कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती मोठ्या प्रमाणात हाताबाहेर गेलेली आहे.(Lok Sabha)
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सांभाळून करावे
परीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांना परीक्षा स्थळापर्यंत पोहोचण्यास अडथळा येऊ नये यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना विनंती राहील की अशा प्रकारचे आंदोलन करताना काळजी घ्यावी. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याशी कधीही आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचा संपर्क आलेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असावे असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या संवादात कशामुळे वीसंवाद तयार होतोय? याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे अशी सुचना त्यांनी केली. (lok sabha election 2024)
मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर होणाऱ्या वारेमाप खर्च
सरकारला उत्पन्न मिळवण्याचे गांभीर्य नाही पण खर्च करण्यात स्पर्धा चालू आहे. कोणत्या मंत्र्याने काय करावं याच्यावर कोणाचेही नैतिक बंधन किंवा अंकुश राहिलेले नाही.त्यामुळे बंगल्यांवर फार मोठ्या प्रमाणात खर्च चालू आहेत, त्याचा हिशोब राज्याचे अर्थमंत्री देतील अशी आमची अपेक्षा आहे असा टोला त्यांनी लगावला. (lok sabha election 2024)
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला. ते म्हणाले की, सत्यपाल मलिक स्पष्टपणाने बोलले याची त्यांना शिक्षा मिळत आहे का ? हे तपासावे लागेल.(lok sabha election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.