Sandeshkhali : तृणमूलचे लोक रात्री २ वाजता बोलवायला यायचे; संदेशखालीच्या पीडित महिलांचा आक्रोश

Sandeshkhali : तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते शिबू हाजरा तिला घरातून उचलायचे. टीएमसीचे लोक मुलींचे सौंदर्य पाहून घेऊन जायचे. मुली त्यांच्यासाठी मनोरंजनाचे साधन होते, असा आक्रोश महिलांनी केला आहे.

177
Sandeshkhali : तृणमूलचे लोक रात्री २ वाजता बोलवायला यायचे; संदेशखालीच्या पीडित महिलांचा आक्रोश
Sandeshkhali : तृणमूलचे लोक रात्री २ वाजता बोलवायला यायचे; संदेशखालीच्या पीडित महिलांचा आक्रोश

भाजपने गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी बंगालमधील (Bengal) संदेशखाली येथील महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. भाजपने या व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये लिहिले की, संदेशखालीचे असे सत्य ज्याने तुम्हाला धक्का बसेल ! अंतरात्म्याला हादरवून सोडणारे सत्य. ममता बॅनर्जी हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Sandeshkhali)

भाजपच्या 20 मिनिटे 41 सेकंदाच्या माहितीपटात संदेशखाली येथील महिला त्यांचे अनुभव कथन करत आहेत. यामध्ये एका महिलेने दावा केला आहे की, तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते शिबू हाजरा तिला घरातून उचलायचे. टीएमसीचे लोक मुलींचे सौंदर्य पाहून घेऊन जायचे. मुली त्यांच्यासाठी मनोरंजनाचे साधन होते.

(हेही वाचा – Anil Desai : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी खासदार अनिल देसाईंच्या पीए विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल)

दादा (शिबू हाजरा) बोलावतोय – रात्री २ वाजता निरोप

एका महिलेने सांगितले की, शिबू हाजराचे लोक रात्री 2 वाजता बोलवायला यायचे. ‘दादा (शिबू हाजरा) बोलावतोय’, असे म्हणायचे. त्याचा आदेश म्हणजे देवाचा आदेश. रात्री 2 वाजता जायचे आणि पहाटे 5 वाजता परत यायचे. मी दुकान चालवते. त्यांनी बोलावल्यावर गेले नसते, तर त्यांनी माझे दुकान फोडले असते.

डॉक्युमेंट्रीमध्ये एका व्यक्तीने सांगितले की, टीएमसीचे (TMC) लोक मला घेऊन गेले. माझ्या बाळाला फेकून दिले. माझ्या पत्नीला मारहाण करून शाहजहान शेखला जाऊन भेटण्यास सांगितले. ‘तृणमूल काँग्रेसचा झेंडा धर, नाहीतर मारला जाशील’, असे सांगितले.

संदेशखालीच्या महिलांनी सांगितले की, शाहजहान शेखचे लोक मीटिंगच्या नावाखाली जबरदस्तीने पक्ष कार्यालयात बोलावत होते. मीटिंगनंतर ते पुरुषांना घरी पाठवायचे आणि महिलांना तिथेच ठेऊन घ्यायचे. त्यांच्यासोबत चुकीचे काम करायचे. कोणत्याही महिलेने कार्यालयात येण्यास नकार दिल्यास तिच्या पतीला घेऊन जात असत.

डीजीपी म्हणाले – दोषींवर कडक कारवाई करू

बंगालचे (West Bengal) डीजीपी राजीव कुमार बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी संदेशखाली येथे गेले. रात्रभर तेथे मुक्काम करून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे परतल्यानंतर डीजीपी राजीव म्हणाले की, पोलीस संदेशखालीतील प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारी ऐकून घेतील आणि दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. लोकांचा छळ करण्यात कोणी सहभागी असेल, तर त्याच्यावर कारवाई करू.

(हेही वाचा – Anil Desai : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी खासदार अनिल देसाईंच्या पीए विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल)

अनुसूचित जमाती आणि मानवाधिकार आयोगाने अहवाल मागवला

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे (NCST) पथक गुरुवारी संदेशखाली येथे गेले. एनसीएसटीचे उपाध्यक्ष अनंत नायक म्हणाले की, आयोगाला संदेशखालीची तक्रार आली आहे. त्या बाबतीत आम्ही तिथे जात आहोत. आम्ही डीजीपी राजीव कुमार आणि बंगालचे मुख्य सचिव बीपी गोपालिका यांच्याकडून अहवाल मागणार आहोत. आम्ही त्यांना तीन दिवसांचा अवधी दिला आहे.

संदेशखाली प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) विशेष पथक गुरुवारी संदेशखालीला भेट देणार आहे. एनएचआरसीने मुख्य सचिव आणि डीजीपी यांनाही नोटीस बजावली असून आरोपींविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत चार आठवड्यांत अहवाल मागवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 6 मार्च रोजी पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखालीला भेट देऊ शकतात. ते येथे लैंगिक छळाला बळी पडलेल्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊ शकतात. बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी ही माहिती दिली.

मजुमदार म्हणाले की, पंतप्रधान मोदी 6 मार्च रोजी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथे महिलांच्या सभेला संबोधित करतील. (Sandeshkhali)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.