Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नेत्यांची आज गृहमंत्री शहा यांच्यासोबत बैठक

110
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नेत्यांची आज गृहमंत्री शहा यांच्यासोबत बैठक
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नेत्यांची आज गृहमंत्री शहा यांच्यासोबत बैठक

महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आज दिल्लीत येणार आहेत. गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांच्यासोबत उभय नेत्यांमध्ये सायंकाळी उशीरा चर्चा होण्याची शक्यता आहे.  (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : पियूष गोयल उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार?)

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची  शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. तरीसुध्दा, भाजपाच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील भाजपाच्या उमेदवारांची काही नावे असू शकतात, अशी माहिती सूत्राने दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

दरम्यान, भाजपा, शिवसेना आणि राकॉ यांच्यात जागा वाटपाच्या मुद्यावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र  फडणवीस, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते उपस्थित राहणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- सर्वाधिक पगार घेणारे कुलपती भारतीय वंशाचे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ Pardeep Kumar Khosla)

यापूर्वी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्रातील नेत्यांची झालेल्या बैठकीत भाजपाकडून दोन प्रस्ताव देण्यात आले होते. आज यावर चर्चा होणे  अपेक्षित आहे. शिंदे यांनी पंधरा-सोळा जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जागांची मागणी केली असल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024)

चारशे जागांचे लक्ष्य

भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाही आहे. यावेळी चारशे जागांचे लक्ष्य गाठायचे आहे. यामुळे एक-एक जागेचा निर्णय अत्यंत विचार करून घेतला जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागा संकटात असल्याची बाब अंतर्गत सर्वेक्षणात दिसून आली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींची विशेष न्यायाधीशांसमोर ओळख परेड झालीच नाही; आरोपींच्या वकिलांचा न्यायालयात खळबळजनक दावा)

शिवसेना आणि राकॉला प्रस्ताव

भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे दोन  प्रस्ताव दिले असल्याचे समजते. जेणेकरून 48 पैकी किमान 45 जागांवर रालोआचे उमेदवार विजयी होतील. पहिल्या प्रस्तावानुसार, भाजपा 34, शिवसेना 10 आणि राकॉ चार जागा लढवू शकते. हा प्रस्ताव मान्य झाला तर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाकडून भरपाई केली जाणार आहे. (Lok Sabha Election 2024)

दुसऱ्या प्रस्तावानुसार, 30 जागा भाजपा लढविणार. शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस सहा जागा लढविणार. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन-तीन उमेदवार त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर नव्हे तर भाजपाच्या तिकीटवर निवडणूक लढतील. यात जागांची अदलाबदल सुध्दा होण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Veer Savarkar : शिवाजी पार्क सभेत बोला; पण वीर सावरकरांचा अवमान कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही; मनसेचा राहुल गांधींना इशारा)

याशिवाय आणखी एका तिसऱ्या प्रस्तावाची सुध्दा चर्चा आहे. यानुसार शिवसेना 13 जागा लढविणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागा लढविणार. उर्वरित 30 जागा भाजपाकडून लढविल्या जातील. मात्र यातही दोन्ही पक्षांचे उमेदवार भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.