Veer Savarkar : शिवाजी पार्क सभेत बोला; पण वीर सावरकरांचा अवमान कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही; मनसेचा राहुल गांधींना इशारा

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी या आधी वीर सावरकर यांचा अपमान केला होता.

161

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात यावे, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथील सभेत बोलणार आहेत, त्यांना ना नाही; पण तिथे येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर त्यांना महाराष्ट्रातील जनता राज्यात फिरू देणार नाही, असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे? 

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी या आधी वीर सावरकर यांचा अपमान केला होता. आता ते महाराष्ट्रात आले आहेत. त्यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) स्मारकासमोर आहे. सावरकरांचे घर हे शिवाजी पार्क मैदानाच्या जवळ आहे. तुम्ही महाराष्ट्रात येत आहात, तुमचे म्हणणे मांडा, त्याला आमची ना नाही. मात्र, इथे येऊन जर तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबद्दल अपमानजनक किंवा दुसरे वक्तव्य केले, तर महाराष्ट्राची 14 कोटी जनता राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. या कोल्ह्यांबरोबर सामील झालेले लांडगे यांनी देखील हे लक्षात ठेवावे की, त्यांचीही महाराष्ट्रात खैर नाही, अशा कडक शब्दात संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे गटाला इशारा दिला आहे.

(हेही वाचा Shri Ram Mandir : अयोध्येत श्रीरामाचे किती वेळात मिळते दर्शन? स्वतः मंदिर ट्रस्टने दिली माहिती)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्र दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप हा मुंबईमध्ये होणार आहे. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली. आहे. महाराष्ट्रासाठी तसेच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधी यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेवरुन राज्यातील राजकारणात बरीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता मनसेच्या वतीने राहुल गांधी यांना हा इशारा देण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.