Lok Sabha Election 2024 : चंद्रपूरमध्ये वाढलेला टक्का कुणासाठी फायदेशीर? जाणून घ्या…

Lok Sabha Election 2024 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान झाले. उन्हाचा तडाखा 42-43 अंशावर असतांनासुद्धा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

140
Lok Sabha Election 2024 : चंद्रपूरमध्ये वाढलेला टक्का कुणासाठी फायदेशीर? जाणून घ्या...
Lok Sabha Election 2024 : चंद्रपूरमध्ये वाढलेला टक्का कुणासाठी फायदेशीर? जाणून घ्या...

चंद्रपूर लोकसभा (Chandrapur Lok Sabha) मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 67.57 टक्के मतदान झाले. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात (Lok Sabha Election 2024) आलेल्या निवडणुकीसाठी 67.57 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42-43 अंशावर असतांनासुद्धा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- IPL 2024 Suryakumar Yadav : क्रिकेटमधील चढ उतारांबद्दल सूर्यकुमार यादवला काय वाटतं?)

शुक्रवारी (१९ एप्रिल) झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजूरा विधानसभा मतदार संघात 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.36 टक्के, वरोरा 67.73 टक्के, वणी 73.24 टक्के तर आर्णि विधानसभा मतदारसंघात 69.52 टक्के मतदान झाले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- IPL 2024 Ashutosh Sharma : जसप्रीत बुमराचा षटकार खेचणारा पंजाबचा अनकॅप्ड आशुतोष शर्मा)

चंद्रपूर लोकसभा (Chandrapur Lok Sabha) मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी 6 लक्ष 58 हजार 400 पुरुष मतदारांनी (69.62 टक्के), 5 लक्ष 83 हजार 541 स्त्री मतदारांनी (65.41 टक्के) तर 11 इतर नागरिकांनी (22.92 टक्के) असे 12 लक्ष 41 हजार 952 (67.57 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.