Lok Sabha Election 2024: मोदींनी ‘माझे लहान भाऊ’, असे म्हणताच जानकरांनी वाजवली शिट्टी, कारण? वाचा…

परभणीचा आशीर्वाद हा ईश्वरीय आशीर्वाद आहे. मात्र जे उन्हात उभे आहेत त्यांची तपस्या वाया जाऊ देणार नाही. तुमच्या या प्रेमाला मी विकासाच्या रुपाने परत करेन, असे मोदी म्हणाले.

144
Narendra Modi: काँग्रेसने 'टेक सिटी'ला 'टँकर सिटी' बनवलं, पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र
Narendra Modi: काँग्रेसने 'टेक सिटी'ला 'टँकर सिटी' बनवलं, पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

परभणीमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा नुकतीच पार पडली. या सभेला भाषणाची सुरुवातच पंतप्रधानांनी मराठीतून केली. परभणीच्या धरतीला साईबाबांचे पवित्र चरण लाभले. संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या चरणी प्रणाम करून त्यांनी उपस्थितांना संबोधित करायला सुरुवात केली. (Lok Sabha Election 2024)

सभेला झालेल्या गर्दीवरून असे दिसून येते की, सभेची जागा अपुरी पडली. परभणीचा आशीर्वाद हा ईश्वरीय आशीर्वाद आहे. अनेक लोकं उन्हात उभे आहेत. त्यासाठी सर्वांची माफी मागतो, मात्र जे उन्हात उभे आहेत त्यांची तपस्या वाया जाऊ देणार नाही. तुमच्या या प्रेमाला मी विकासाच्या रुपाने परत करेन, असे मोदी म्हणाले.

(हेही वाचा – IPL 2024 Suryakumar Yadav : क्रिकेटमधील चढ उतारांबद्दल सूर्यकुमार यादवला काय वाटतं?)

भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे उद्दिष्ट
यंदाच्या निवडणुकीचे उद्दिष्ट हे भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे आहे. त्यामुळे २०२४चे निवडणुकीचे मुद्दे सामान्य नाहीत. प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे २०२४चे निवडणुकीचे मुद्दे सामान्य नाहीत. प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रत्येक पाऊल, संकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी ही निवडणूक आहे, असे मोदी म्हणाले.

सर्जिकली स्ट्राईकची चर्चा होते
मोदी पुढे म्हणाले की, २०१४ पूर्वी दहशतवादासारख्या मुद्द्यांवर चर्चा व्हायची, मात्र ५ वर्षांत परिस्थिती अशी बदलली की, सर्जिकली स्ट्राईकची चर्चा होते. सब का साथ, सबका विकासच्या आधारे हे सरकार काम करते. आता बाहेर मोदी घर मे घुसके मारता है, अशी भीती आहे, असे मोदी म्हणाले.

महादेव जानकर ”लहान भाऊ”
येणाऱ्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार आणि माझे लहान भाऊ महादेव जानकर यांना तुम्हाला विजयी करायचे आहे, असे म्हणत मोदींनी परभणीकरांना आवाहन केले तसेच घरोघरी मोदींचा नमस्कार पोहोचवा त्यामुळे मला आशीर्वाद मिळतील. हेच आशीर्वाद मला देशासाठी दिवस-रात्र काम करण्यासाठी प्रेरणा देतात, असेही परभणी येथील सभेत मोदी म्हणाले. माझा लहान भाऊ महादेव जानकर, त्यांना संसदेत पाठवा, असे मोदींनी म्हणताच मंचावर आनंदाच्या भरात जानकरांनी जोरजोराने शिट्टी वाजवली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.