Lok Sabha Election 2024 : दिल्लीत ५ वर्षांत ३० टक्क्यांनी बेघर मतदार वाढले

मोकळ्या आकाशाखाली, रस्त्याच्या कडेला, फूटपाथवर आणि उड्डाणपुलाखाली निवाऱ्यात राहावे लागते. या बेघरांना मतदानाची संधी मिळणार आहे. बेघर मतदारांचे सर्वेक्षण करून मतदार ओळखपत्र बनविण्यात आले आहेत.

81
Lok Sabha Election 2024 : दिल्लीत ५ वर्षांत ३० टक्क्यांनी बेघर मतदार वाढले

देशाच्या राजधानीत १०,४१५ बेघर लोक मतदान करणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अशा मतदारांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या निवडणुकीत ८,००० बेघर मतदार होते. त्यापूर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत १०३२ लोक बेघर होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी २४०० बेघर मतदारांची वाढ झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

बेघर मतदारांची नावे यादीत नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी बीएलओ सर्वेक्षण करून बेघर मतदारांच्या याद्या तयार केल्या जातात. हे सर्वेक्षण दोन-तीन वेळा केले जाते. या कालावधीत बेघर व्यक्ती एकाच ठिकाणी सतत वास्तव्य करताना आढळून आल्यास, त्यांना त्या भागातील रहिवासी मानले जाते आणि त्यानंतर मतदार ओळखपत्र बनवले जाते. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार; पत्रकार परिषद घेऊन केली घोषणा)

मोकळ्या आकाशाखाली, रस्त्याच्या कडेला, फूटपाथवर आणि उड्डाणपुलाखाली निवाऱ्यात राहावे लागते. या बेघरांना मतदानाची संधी मिळणार आहे. बेघर मतदारांचे सर्वेक्षण करून मतदार ओळखपत्र बनविण्यात आले आहेत. अशा प्रकारे लोकशाहीच्या महान उत्सवात बेघरांचा सहभाग निश्चित केला जात आहे. त्यांना निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी प्रवृत्त केले जात आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.