Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये दीर आणि भावजय यांच्यात लढत

राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी

140
Lok Sabha Election 2024 : दिल्लीत ५ वर्षांत ३० टक्क्यांनी बेघर मतदार वाढले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि भाजपाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांच्यात लढत होईल. हे दोन्ही उमेदवार नात्याने दीर-भावजय आहेत. (Lok Sabha Election 2024)

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला लोकसभेच्या पाच जागा आल्या आहेत. यापैकी रायगड, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केले आहेत. सुनील तटकरे यांनी गुरुवारी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वी त्यांनी तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांना लगेच लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. राज्यात महायुती लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार असून धाराशिवची जागा मोठ्या मताधिक्क्याने निवडून येईल, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होत असताना धाराशिव लोकसभा मतदारसंघातील आमदार राणा जगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, ज्ञानराज चौगुले, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Contaminated Water : विक्रोळीत म्हाडाच्या पंपहाऊसमधीलच पाणी दुषित, पण महापालिकेला केले गेले टार्गेट)

दरम्यान, नाशिक लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा येत्या एक-दोन दिवसात होईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. महायुतीत आणखी काही जागांवर चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाला किती जागा मिळाल्या आणि त्यांचे उमेदवार यांची एकत्रित माहिती दिली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ या निवडणूक चिन्हाच्या वापराबाबात ज्या सूचना केल्या आहेत त्याची माहिती आम्ही लोकसभा निवडणुकीत उमेदवार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आदींना देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या ऐवजी यशवंतराव चव्हाण छायाचित्र वापरणार असल्याचे सुनील तटकरे यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.