Contaminated Water : विक्रोळीत म्हाडाच्या पंपहाऊसमधीलच पाणी दुषित, पण महापालिकेला केले गेले टार्गेट

1974
Road Side Drain : पेटीका नाल्यांमधील काढलेला गाळ सुकल्यानंतरही तिथेच, रस्त्यालगत लोकांकडून तुडवला जातो गाळ

विक्रोळी येथील कन्‍नमवार नगरमध्‍ये दूषित पाणीपुरवठा होत असल्‍याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्यानंतर महानगरपालिकेने स्‍वत: दूषित पाणीपुरवठ्याची जागा शोधण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. जलवाहिनीतील गळती, दूषित स्रोत शोधण्यासाठी अत्याधुनिक क्राऊलर कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे. दरम्यान, म्हाडाचा पंप रुम क्रमांक १ येथे दूषित पाणी आढळून आले असून त्याबाबत, उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागामार्फत ‘म्हाडा’ ला अवगत करण्यात आले. त्यामुळे म्हाडाच्या निष्काळजीपणामुळे दुषित पाण्याच्या पुरवठ्यात महापालिकेलाच टार्गेट केल्याचे दिसून आले. (Contaminated Water)

कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक १४ व आजूबाजूचा परिसर हा ‘म्हाडा’ अंतर्गत येतो. त्या ठिकाणी अस्तित्त्वात असलेले जलवाहिनीचे जाळे हे ‘म्हाडा’ प्राधिकरणाच्या मालकीचे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीमधून म्हाडा प्राधिकरणाच्या अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या भूमिगत टाक्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर परिसरात म्हाडा क्षेत्रात असलेल्या स्वतंत्र इमारतींना ‘म्हाडा’ प्राधिकरणाद्वारे त्यांच्या पाणी वितरण व्यवस्थेद्वारे पुरवठा केला जातो. म्हाडा न्यासाच्या अंतर्गत जलवाहिनीचे जाळे हे ‘म्‍हाडा’च्या मालकीचे असल्‍याने त्याचे प्रचलन व परिरक्षण देखील त्यांच्याद्वारे केले जाते. (Contaminated Water)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर)

दूषित स्रोत शोधण्यासाठी अत्याधुनिक क्राऊलर कॅमेऱ्याचा वापर

या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्‍त होताच सार्वजनिक हित लक्षात घेता महानगरपालिकेने स्वतः दूषित पाणीपुरवठ्याची कारणे व जागा शोध घेण्याची कार्यवाही सुरु केली. म्हाडाचा पंप रुम क्रमांक १ येथे दूषित पाणी आढळून आले. त्याबाबत, उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागामार्फत ‘म्हाडा’ ला अवगत करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाने दूषित पाणी गळतीच्या नेमक्या ठिकाणाचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. जलवाहिनीतील गळती, दूषित स्रोत शोधण्यासाठी अत्याधुनिक क्राऊलर कॅमेऱ्याचा वापर करण्यात येत आहे. मलनिस्सारण वाहिन्यांमधून गळती होऊन पाणी वाहताना आढळल्याने मलनिस्सारण वाहिनी यंत्रणेला देखील त्यांच्या अखत्यारितील दुरुस्ती तत्काळ करण्यासाठी कळवले. त्यानुसार ती कामे देखील हाती घेतली आहेत. (Contaminated Water)

त्याचप्रमाणे, सार्वजनिक आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने खबरदारीचा उपाय म्‍हणून मुंबई महानगरपालिकेच्‍या कन्नमवार नगर आरोग्य केंद्रातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांमार्फत कन्नमवार नगरमधील इमारत क्रमांक ६, ७, ८, १२, १८ मध्ये एकूण ५०० घरे आणि २ हजार ६५८ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी ३ नागरिकांना मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्‍या आढळल्या. त्यांना योग्य वैद्यकीय उपचार पुरवले आहेत. क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रूग्णालय आणि ७ खासगी दवाखान्यात आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयांनी भेट दिली. महानगरपालिकेचे रूग्णालय किंवा खासगी दवाखान्यामध्‍ये जलजन्य संसर्ग रूग्णांची वाढ आढळून आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात येत आहे. दरम्यान, दूषित पाणीपुरवठा होत असलेल्‍या इमारतीतील पाण्याचे नमुने घेण्‍यात आले असून महानगरपालिकेच्‍या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्‍यात आले आहेत. त्यावर प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार पुढील योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. (Contaminated Water)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.