Lok Sabha Election 2024 : सांगलीवरून उबाठा आणि काँग्रेसमध्ये वाद 

344

सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत सर्व जागांमध्ये एकवाक्यता होताना दिसत नाही. महाविकास आघाडीतही सांगली मतदार संघावरून काँग्रेस आणि उबाठा या दोन पक्षांत वाद सुरु झाला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली.

नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर  काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 :…Vijay Shivtare यांच्यावर केव्हा होणार कारवाई; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले)

उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याला परस्पर त्यांची उमेदवारी (Lok Sabha Election 2024) घोषित केली. त्यावरून कॉँग्रेस नाराज झाली आहे. त्यांच्याकडे चांगले उमेदवार होते, असे नाना पटोले म्हणाले. देशाचे संविधान व लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे. आताची निवडणूक ही देश वाचवण्यासाठी आहे. भाजपाचा पराभव करणे हाच मुख्य उद्देश आहे. महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव करेल. मागील १० वर्षात भाजपाने खोटी आश्वासने देऊन देशाला बरबाद केले त्याचा उगम हा नागपुरच आहे, असे नाना पटोले म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.