lok Sabha Election 2024 : दिल्लीतील तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार जाहीर

कन्हैया कुमारही उमेदवार

120
lok Sabha Election 2024 : दिल्लीतील तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार जाहीर

दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आघाडी केली आहे. त्यानुसार काँग्रेसनं आपल्याकडील तीन जागांवर उमेदवार रविवारी (१४ एप्रिल) जाहीर केले आहेत. आक्रमक आणि दमदार वक्तृत्वशैलीतून विरोधकांची चिरफाड करणाऱ्या कन्हैया कुमारला काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. दिल्लीतील उत्तर-पूर्वमधून मतदारसंघातून कन्हैया कुमारला काँग्रेसने निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्याशी कन्हैयाची लढत होणार आहे. (lok Sabha Election 2024)

काँग्रेसने रविवारी रात्री १० उमेदवारांची यादी जाहीर केली. दिल्लीत तीन जागांवर पक्ष निवडणूक लढविणार असून तीनही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले. उत्तर-पूर्वमधून कन्हैया कुमार, उत्तर पश्चिम उदित राज, चांदणी चौकातून जे. पी. अगरवाल यांना तिकीट देण्यात आले आहे. (lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Iran – Israel Tension : इस्रायलवर हल्ला करणाऱ्या IRGCचे सदस्य आहेत इस्लामचे सैनिक)

पंजाबमधील अमृतसरमधून गुरजितसिंग औजला, जालंधरमधून माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, फतेहगड साहिब मतदारसंघातून अमतसिंग, भटिंडामध्ये जीत मनोहरसिंग सिद्धू, संगसूर मतदारसंघात सुखपालसिंग खैरा, तसेच पतियाळा मतदारसंघात धर्मवीर गांधी यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मतदारसंघात पक्षाने उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना तिकीट दिलं आहे. दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत. गतवेळी सर्व सातच्या सात जागा भाजपाने जिंकल्या होत्या. (lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.