Sudarsan Pattnaik : वाळूने सुंदर कलाकृती निर्माण करणारा अवलिया – सुदर्शन पटनायक

सँड इंडिया डॉट कॉमच्या माध्यमातून जगभरातील कलाकारांशी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. २०१४ मध्ये, भारत सरकारने त्यांना समुद्रकिनारी वाळूची कलाकृती दाखवल्याबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. (Sudarsan Pattnaik)

123
Sudarsan Pattnaik : वाळूने सुंदर कलाकृती निर्माण करणारा अवलिया - सुदर्शन पटनायक

सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) हे ओडिशातील पुरी येथील एक वाळू कलाकार आहेत. १५ एप्रिल १९७७ मार्चकोट लेन, पुरी जिल्हा, ओडिशा येथे एका गरीब कुटुंबात सुदर्शन यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण चालू असतांना त्यांना काही घरगुती कारणांमुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. वयाच्या सातव्या वर्षापासून पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वाळुंच्या कणांतून त्यांनी विविध वालुका मूर्ती घडविल्या. (Sudarsan Pattnaik)

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट वाळू शिल्पकार हा किताब त्यांना (Sudarsan Pattnaik) २००८ मध्ये त्यांच्या पदार्पणातच मिळाला. कलेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळत गेल्यानंतर वाळुशिल्पात त्यांना मोठा मान मिळू लागला. फेब्रुवारी २०१७ मध्ये, त्याने ओडिशामधील पुरी बीचवर असलेला जगातील सर्वात मोठा वाळूचा किल्ला बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) मोडला. (Sudarsan Pattnaik)

(हेही वाचा – IPL 2024, Brian Lara on Suryakumar Yadav : सुर्यकुमारच्या फलंदाजीला ब्रायन लाराने काय नाव दिलंय?)

रशियाच्या समुद्रकिनाऱ्यावर बनवलेल्या त्यांच्या कलाकृतीला पिपल्स चॉईस हा पुरस्कार मिळाला. पुढे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळत गेली. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ओरिया, बंगाली, हिंदी, इंग्रजी भाषेवरही त्यांनी (Sudarsan Pattnaik) प्रभुत्व मिळवले. सँड इंडिया डॉट कॉमच्या माध्यमातून जगभरातील कलाकारांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. २०१४ मध्ये, भारत सरकारने त्यांना समुद्रकिनारी वाळूची कलाकृती दाखवल्याबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. (Sudarsan Pattnaik)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.