Iran-Israel Tension : इस्रायल-इराण संघर्षामुळे भारतातील विमान प्रवास महागणार 

Iran-Israel Tension : इंधनांच्या किमतींबरोबरच इराणवरून उड्डाण करणंही कंपन्या टाळत आहेत.

138
Iran-Israel Tension : इस्रायल-इराण संघर्षामुळे भारतातील विमान प्रवास महागणार 
  • ऋजुता लुकतुके

मध्य-पूर्व आशियात इराण आणि इस्रायल (Iran-Israel Tension) दरम्यानच्या संघर्षामुळे अनिश्चितता वाढली आहे. त्यातच १३ एप्रिलला इराणने इस्रायलच्या दिशेनं क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याचा परिणाम आता विमान प्रवासावर होणार आहे. भारतातून युरोपच्या दिशेनं होणाऱ्या उड्डाणांचा खर्च वाढणार आहे. एअर इंडिया (Air India) आणि विस्ताराने युरोपला जाणाऱ्या विमानांचं भाडं वाढवण्याचं सुतोवाच केलं आहे. कारण, इराणची हद्द टाळून युरोप (Europe) आणि अमेरिकेत जाण्याचं त्यांचं धोरण आहे. (Iran-Israel Tension)

‘आताच्या भू-राजकीय परिस्थितीचा फटका मध्य-पूर्वेतील काही देशांना बसला आहे. तो भाग टाळून उड्डाण करण्याचं आमचं धोरण असेल. ती हवाई हद्द टाळायची झाली तर विमान प्रवास (Air Travel) वाढणार आहे. त्याप्रमाणे तिकीट दरही आम्हाला वाढवावे लागतील,’ असं विस्ताराच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. विमान प्रवास आखताना कायम एकापेक्षा जास्त मार्गांचा पर्याय विमान कंपनी समोर ठेवत असते. आता मध्य-पूर्व देश टाळून लांबचा मार्ग स्वीकारण्यावाचून विमान कंपन्यांकडे पर्याय नसेल. (Iran-Israel Tension)

(हेही वाचा – CM Eknath shinde: मविआत उबाठाची अवस्था उठ बस सेना – मुख्यमंत्री)

हवाई प्रवास लांबला तर त्याचा परिणाम अर्थातच विमान तिकिटांवर होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही (Ministry of External Affairs) मध्य-पूर्वेतील परिस्थितीवर लक्ष असल्याचं स्पष्ट केलं आहे. १२ एप्रिल रोजी प्रवासासाठी हाय अलर्ट जारी करताना मंत्रालयाने मध्य-पूर्वेच्या देशात अनावश्यक प्रवास टाळण्याचाच सल्ला भारतीयांना दिला आहे. फक्त भारतच नाही तर जगभरात अनेक देशांनी सध्या मध्य-पूर्वेच्या बाबतीत सावधानतेचं धोरण ठेवलं आहे. १ एप्रिल रोजी इस्रायलने इराणच्या दमास्कस येथील दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा इराणचा आरोप आहे. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडलेले असून इराणने प्रत्युत्तर म्हणून १३ एप्रिलला इस्रायलवर क्षेपणास्त्र डागली. (Iran-Israel Tension)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.