Hasrat Jaipuri : ’तेरी प्यारी प्यारी सूरत को’ अशी सदाबहार गाणी लिहिणारे हसरत जयपूरी

जयपुरी यांनी १९७१ पर्यंत राज कपूर यांच्या जवळजवळ सर्व चित्रपटांसाठी गीते लिहिली. हसरत जयपूरी हे हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चित्रपट गीतकार झाले. (Hasrat Jaipuri)

128
Hasrat Jaipuri : ’तेरी प्यारी प्यारी सूरत को’ अशी सदाबहार गाणी लिहिणारे हसरत जयपूरी

हसरत जयपुरी (Hasrat Jaipuri) हे एक भारतीय कवी होते, ज्यांनी हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये लेखन केले. त्यांचे खरे नाव इक्बाल हुसेन असे होते. त्यांचा जन्म १९२२ रोजी जयपूरमध्ये झाला. उर्दू कवी फिदा हुसेन ‘फिदा’ यांच्याकडून त्यांनी उर्दू आणि पर्शियन भाषेचे शिक्षण घेतले. ते वीस वर्षांचे असताना त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. (Hasrat Jaipuri)

त्यांनी एका मुलीला लिहिलेल्या प्रेमपत्राचं गाण झालं. ‘ये मेरा प्रेम पत्र पढ कर, के तुम नाराज ना होना.’ पुढे ही कविता राज कपूर यांनी आपल्या संगम या चित्रपटासाठी वापरली आणि हे गाणं सुपरहिट झालं. १९४० मध्ये हसरत जयपुरी (Hasrat Jaipuri) मुंबईत आले. सुरुवातीला त्यांनी बस कंडक्टर म्हणून काम केले. त्यांना महिन्याला अकरा रुपये पगार मिळत होता. नोकरी करता करता ते मुशायऱ्यांमध्ये सहभागी होत असत. (Hasrat Jaipuri)

(हेही वाचा –  IPL 2024, CSK vs MI : रोहित शर्मा ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय)

एका मुशायरामध्ये पृथ्वीराज कपूर यांनी जयपूरी (Hasrat Jaipuri) यांना हेरलं आणि राज कपूर यांच्याकडे संधी देण्याची विनंती केली. तेव्हा राज कपूर बरसात या प्रेमकथेचा विचार करत होते. तेव्हा या चित्रपटासाठी जयपूरी यांचे पहिले गाणे रेकॉर्ड झाले, ’जिया बेकरार है’… आणि या गाण्याला लोकांची पसंती लाभली. पुढे जयपुरी यांनी १९७१ पर्यंत राज कपूर यांच्या जवळजवळ सर्व चित्रपटांसाठी गीते लिहिली. हसरत जयपूरी (Hasrat Jaipuri) हे हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चित्रपट गीतकार झाले. त्यांना दोन वेळा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. (Hasrat Jaipuri)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.