Lok Sabha Election 2024 : मुंबई उत्तर-पश्चिममधून संजय निरुपम यांना उमेदवारी? 

उमेदवारीसाठी आवश्यक असणारी गणिते जुळवण्यात निरुपम हे हुशार असल्याने त्यांनी आपली उमेदवारी जवळपास निश्चित केल्याचे मानले जात आहे.

258

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ कलाकार शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची लोकप्रियता पाहता आणि लोकभावना लक्षात घेता मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शरद पोंक्षे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. समाजमाध्यमातून जाहीरपणे तशी मागणीही केली जात होती. मात्र प्रसिद्धी असली तरी उमेदवारीसाठीचे ‘गणित’ जुळवण्यात शरद पोंक्षे हे कमी पडल्याने आता या मतदारसंघातून संजय निरुपम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याचे जवळपास निश्चित असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

निरुपम यांना शिवसेनेतून उमेदवारी?

शरद पोंक्षे यांनी निवडणूक  (Lok Sabha Election 2024) लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर समाजमाध्यमावर पोस्ट व्हायरल झाल्या. त्यामध्ये ‘नव्या स्वप्नांसाठी भ्रष्टाचारमुक्त, शरद पोक्षेंना उत्तर मुंबईत आमचे समर्थन’, असे लिहिलेल्या आणि त्याखाली ‘अबकी बार ४०० पार’, असा उल्लेख असलेल्या पोस्टचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभेच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेकडून ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडल्याने येथील राजकीय गणिते बदलली. संजय निरुपम यांना भाजपामध्ये घेण्यास पक्षातूनच तीव्र विरोध असल्याने ते शिवसेनेत प्रवेश करतील आणि त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा Swatantrya Veer Savarkar : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

याआधी वायकर यांचेही नाव होते चर्चेत 

याआधी या मतदारसंघात शरद पोंक्षे आणि रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा होती. त्यात सर्वच पातळ्यांवर पोंक्षे यांचे पारडे जड होते. मात्र संजय निरुपम हे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याने येथील समीकरणे बदलली आहेत. उमेदवारीसाठी आवश्यक असणारी गणिते जुळवण्यात निरुपम हे हुशार असल्याने त्यांनी आपली उमेदवारी जवळपास निश्चित केल्याचे मानले जात आहे. (Lok Sabha Election 2024)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.