Lok Sabha Election 2024: आठवी उमेदवार यादी जाहीर, भाजपाकडून सनी देओलला उमेदवारी नाही

लोकसभेच्या ५४३ जागांपैकी भाजपाने आतापर्यंत ४१४ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जूनदरम्यान ७ टप्प्यांत निवडणुका होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

154
Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्याची निवडणूक भाजपाच्या गडात

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शनिवारी, (३० मार्च) आठवी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यात ओडिशाच्या ३ पंजाबच्या ६ आणि पश्चिम बंगालच्या २ लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभेच्या ५४३ जागांपैकी भाजपाने आतापर्यंत ४१४ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जूनदरम्यान ७ टप्प्यांत निवडणुका होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपाच्या आठव्या उमेदवार यादीत पंजाबच्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी दिनेश सिंग यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय अन्य पक्षांच्या खासदारांनाही तिकीट देण्यात आले आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत 195 नावे जाहीर करण्यात आली असून त्यात ३४ केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची नावे आहेत. पहिल्या यादीत २८ महिलांनाही संधी देण्यात आली आहे, तर ७२ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत नागपूरमधून नितीन गडकरी आणि हमीरपूरमधून अनुराग ठाकूर यांना तिकीट देण्यात आले होते.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : यंदा राज्यभरातून किती मतदार घरबसल्या मतदान करणार, जाणून घ्या आकडा )

२१ मार्चला तिसरी यादी जाहीर 
भाजपाने २१ मार्च रोजी तिसरी यादी जाहीर केली होती. त्यामध्ये ९ उमेदवारांची घोषणा केली. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना भाजपाने कोईम्बतूर निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. चेन्नई दक्षिणमधून तमिलिसाई सुंदरराजन, चेन्नई सेंट्रलमधून विनोज पी. सेल्वम, ए. सी. षणमुगम. कृष्णगिरी येथील सी. नरसिंहन, निलगिरी येथील एल. मुरुगन, पेरांबलूर ते टी.आर. परिवेंदर, थुथुकुडी येथील नैनर नागेंद्रन आणि कन्याकुमारी येथील पोन. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर २२ मार्च रोजी चौथी यादी जाहीर करत तामिळनाडूमधील १४ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. याशिवाय पुद्दुचेरीच्या एका जागेसाठी उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबतच गेल्या २४ मार्च रोजी १११ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत माजी केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांच्या जागी गाझियाबादमधून स्थानिक आमदार अतुल गर्ग यांना पक्षाने तिकीट दिले आहे, तर बिहारमधील बक्सरमधून केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे तिकीट कापून मिथिलेश तिवारी यांना उमेदवारी दिली आहे तसेच पिलीभीतमधून वरुण गांधी यांचे तिकीटही रद्द करण्यात आले.

सहाव्या यादीत ३, सातव्या यादीत २ उमेदवारांची घोषणा…
गेल्या २६ मार्च रोजी भाजपाने सहावी यादी जाहीर केली होती. यामध्ये ३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. राजस्थानसाठी २ आणि मणिपूरसाठी १ उमेदवाराची नावे यादीत जाहीर करण्यात आली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी २७ मार्च रोजी भाजपाने सातवी यादी जाहीर केली. यामध्ये २ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती, तर कर्नाटकच्या चित्रदुर्ग मतदारसंघातून भाजपाने गोविंद करजोल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.