माझ्या मतदारसंघाला ५८० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती चुकीची – जयंत पाटील

96
Jayant Patil : सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नको; जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Jayant Patil : सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नको; जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉंईट ऑफ इन्कॉर्मशनच्या माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटींचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, एका वृत्तपत्रामध्ये माझ्या मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटी रुपये निधी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशाप्रकारे निधी मागण्यासाठी मी कुणाला पत्रही लिहिले नाही असे स्पष्टीकरण त्यांनी सभागृहात दिले.

(हेही वाचा – कोकणातील विश्रामगृहांची दुरावस्था दूर करणार का?, प्रविण दरेकरांचा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना सवाल)

दरम्यान, माझ्या मतदारसंघाला नियमानुसार जवळपास २० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र काही वृत्तपत्र या संदर्भातील चुकीच्या माहिती दिल्याने लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल असे मत त्यांनी सभागृहात मांडले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले की, मला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे वृत्त प्रसारित होत आहे मात्र यात काहीही तथ्य नाही. पुरवणी मागण्यांमध्ये मला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला हा गैरसमज आहे. हे आकडे खरे नाहीत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.