Veer Savarkar : सावरकरांचा अवमान करणाऱ्या सुधीर गावड विरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनीही सुधीर गावड याने ज्या अश्लाघ्य शब्दांचा वापर करून वीर सावरकर यांचा अवमान केला, त्याचे पुरावे पाहून तातडीने त्वरित गुन्हा दाखल करून घेतला.

205

क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद शब्दाचा वापर करून त्यांचा सोशल मीडियावर अवमान करण्यात आला. हा अवमान करणारा सुधीर गावड याच्या विरोधात माहिम पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम ५०५ (२) अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानदा प्रबोधन संस्थेचे पदाधिकारी आणि सावरकर प्रेमी प्रशांत पळ, नितिन येंडे, राज दुदवडकर, मनोज म्हामुणकर, योगेश सारंगुळ, ॲड. भक्ति जोगल, भास्कर देवाडिगा, राजेश पवार यांनी स्वाक्षरी करून त्वरित गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती पत्र पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांना सुपूर्द केले. पोलिसांनीही सुधीर गावड याने ज्या अश्लाघ्य शब्दांचा वापर करून वीर सावरकर यांचा अवमान केला, त्याचे पुरावे पाहून तातडीने त्वरित गुन्हा दाखल करून घेतला. सावरकरप्रेमी प्रशांत पळ यांनी वीर सावरकर यांच्यावर पोस्ट टाकली होती, त्यावर सुधीर गावड याने त्यावर कमेंट करताना अतिशय अश्लाघ्य शब्दांत प्रतिक्रिया लिहिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा देशासाठी केलेला त्याग हा खूप मोठा आहे. अशा महान क्रांतिकारकाबद्दल असे लिखाण करणे हे योग्य नाही, असे पोलीस अधिकारी म्हणाले. न्याय व्यवस्थेकडून परवानगी घेऊन पोलीस अधिकारी सुधीर गावड याच्यावर कारवाई करणार आहेत. त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सावरकरप्रेमींनी केली आहे, जेणे करून असे कृत्य कोणी करण्याची हिंमत करणार नाही, अशी भूमिका यावेळी सावरकर प्रेमींनी केली.

(हेही वाचा Veer Savarkar : वीर सावरकरांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी मानवंदना – रणजित सावरकर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.