Dharavi : धारावीत तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत पेटवले; तरुणी गंभीर

मोहिनी रामजीत जैस्वाल (२०) या जाळपोळीत होरपळलेल्या तरुणीचे नाव आहे. ती आई काजल (५०) सोबत धारावीतील राजीव गांधी नगर येथे राहण्यास आहे.

120

धारावीत २० वर्षीय तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या जाळपोळीत गंभीररित्या भाजलेल्या तरुणीला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हल्लेखोराला बदलापूर येथून अटक केली आहे. हल्लेखोर हा तरुणीचा मानलेला मामा असून जुन्या भांडणाच्या रागातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोहिनी रामजीत जैस्वाल (२०) या जाळपोळीत होरपळलेल्या तरुणीचे नाव आहे. ती आई काजल (५०) सोबत धारावीतील राजीव गांधी नगर येथे राहण्यास आहे. आरोपी नंदकुमार पटेल हा या मयत तरुणीचा मानलेला मामा असून तो देखील त्यांच्यासोबत राहण्यास आहे. मंगळवारी रात्री मामा नंदकुमार याने जुने भांडण उकरून काढत मयत तरुणी मोहिनी सोबत भांडण करू लागला, मोहिणी आणि नंदकुमार यांच्यात जोरदार भांडण झाले, दरम्यान नंदकुमार याने बाहेर जाऊन बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन आला व घरात बसलेल्या मोहीणीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. या जाळपोळीनंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला. जाळपोळीत होरपळलेल्या मोहिणीला आईने शेजाऱ्यांच्या मदतीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी धारावी पोलीसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नंदकुमार पटेल विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बदलापूर येथून अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा J J Hospital : डॉ. लहाने यांच्यासह ९ डॉक्टरांनी दिले तडकाफडकी राजीनामे…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.