BMC : नाल्यातून गाळ काढला नाही तर ‘या’ मोबाईल व्हॉट्सअपवर पाठवा फोटो आणि करा तक्रार

बईतील नागरिकांना ९३२४५००६०० या क्रमांकावर नाल्यातून गाळ काढण्याच्या तक्रारीसाठी तक्रारीचे नेमके ठिकाण, विभाग, दिनांक आणि वेळ आदी माहिती द्यावी लागणार आहे.

169

मुंबईतील नाल्यांतून गाळ काढण्याच्याबाबत तक्रार करण्यासाठीची प्रक्रिया नागरिकांसाठी सुलभ व्हावी, तसेच या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांसाठी वापरकर्त्यांसाठी अनुकूल अशी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना आपल्या भागातील नाल्यातून गाळ काढण्याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्सअप चॅटबॉट प्रणालीच्या माध्यमातून ९३२४५००६०० या क्रमांकावर नोंदवता येणार आहे. येत्या १ जून २०२३ पासून मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाची व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक कार्यरत होणार आहे. त्यामुळे आपल्या विभागातील नाल्यांची सफाई न झाल्यास आपण या व्हॉट्सअप क्रमांकावर फोटो पाठवून तक्रार नोंदवून महापालिकेच्या निदर्शनास आणून देऊ शकतात.

तक्रार किंवा अभिप्राय असा नोंदवा

मुंबईतील नागरिकांना ९३२४५००६०० या क्रमांकावर नाल्यातून गाळ काढण्याच्या तक्रारीसाठी तक्रारीचे नेमके ठिकाण, विभाग, दिनांक आणि वेळ आदी माहिती द्यावी लागणार आहे. जीपीएस (GPS) लोकेशनसह फोटो टाकल्यास तक्रारीचे ठिकाण शोधण्यास अधिक उपयुक्त ठरेल. चॅटबॉट सिस्टिम अंतर्गत ही हेल्पलाईन असणार आहे. नागरिकांना तक्रारीसाठीचा पूर्ण तपशील सादर करावा लागणार आहे.

(हेही वाचा Aahilyadevi Holkar Nagar : आता अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार)

तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारास तक्रार क्रमांक मिळेल. तक्रार निवारण केल्यावर त्याचा फोटो तक्रारदारास अवगत केला जाईल. सदर व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक हा केवळ माहिती पाठविण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या क्रमांकावर कोणत्याही पद्धतीचे संभाषण करण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध नसेल.

तक्रारी सोडविण्यासाठी यंत्रणा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांतील पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या सहायक अभियंता आणि २४ विभाग कार्यालयात तक्रारी पाहण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.