इंडी आघाडीचा फॉर्म्युला ‘वन इयर वन पीएम’; PM Narendra Modi यांचे टीकास्त्र

169

आज लोकसभा निवडणुकीत एनडीएने पंतप्रधान पदासाठी मोदींचे नाव तुमच्या समोर ठेवले आहे, पण इंडी आघाडीचे काय, त्यांनी पंतप्रधान पदासाठी अजून उमेदवारच जाहीर केला नाही, मग तुम्ही त्यांना कुणाच्या भरवशावर मते देणार आहात, हे अंधारात बाण मारण्यासारखे आहे. लक्षात घ्या इंडी आघाडीचा फॉर्म्युला तयार आहे, वन ईयर वन पीएम, म्हणजे दर वर्षाला नवीन पंतप्रधान, लक्षात घ्या ही गोष्ट गांभीर्याने घ्या. यामुळे देशाची नाव जगात रसातळाला जाईलच, त्याच बरोबर तुमच्या स्वप्नांचाही चुरडा होईल, असा घणाघाती हल्ला PM Narendra Modi यांनी इंडी आघाडीवर केला.

(हेही वाचा Sam Pitroda यांच्या वारसा करावरील विधानावरून PM Narendra Modi यांचा हल्लाबोल; काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी)

इंडी आघाडी पंतप्रधानाच्या खुर्चीचा लिलाव करणार 

PM Narendra Modi प्रचारसभेत बोलत होते. इंडी आघाडीच्या वन ईयर वन पीएम या फॉर्म्युल्यामुळे काय होईल, तर पंतप्रधानाच्या खुर्चीचा लिलाव होईल, ज्याची बोली जास्त तो एक वर्षासाठी पदावर बसेल, पण त्या खुर्चीच्या चारही पायांवर इंडी आघाडीतील बाकीचे पक्ष चिटकून राहतील आणि कधी त्याचे एक वर्ष पूर्ण होते आणि आपण त्यावर बसतोय याची वाट पाहत राहील. हे अतिशय भयंकर चित्र आहे. यामुळे जगात वर पोहचलेले देशाचे नाव क्षणात रसातळाला जाईल. अशी आघाडी देश चालवूच शकत नाही. अशा आघाडीकडे देश तुम्ही सोपवणार आहात का? याउलट एनडीएकडे मोदी नावाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे. तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही कुणाला मत देत आहात, पण इंडी आघाडीला मत देणे म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखे आहे, ज्याने देशाचे प्रचंड नुकसान होणार आहे, असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.