Lok Sabha Election 2024 : सांगलीच्या बंडखोरीवर काँग्रेसचे मौन; कोल्हापुरातील बंडखोरावर कारवाई

काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. शाहू महाराज यांच्या विरोधात काँग्रेसचे सहयोगी प्रदेश प्रतिनिधी बाजीराव खाडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

119
Lok Sabha Election 2024 : सांगलीच्या बंडखोरीवर काँग्रेसचे मौन; कोल्हापुरातील बंडखोरावर कारवाई

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांच्यावर काँगेसने बुधवारी (२४ एप्रिल) निलंबनाची कारवाई केली. खाडे यांच्यावर कारवाई करणाऱ्या काँग्रेसने मात्र सांगली लोकसभा मतदारसंघातील बंडखोर नेते विशाल पाटील यांच्यावरील कारवाईबाबत काँग्रेसने अद्याप मौन पाळले आहे. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. शाहू महाराज यांच्या विरोधात काँग्रेसचे सहयोगी प्रदेश प्रतिनिधी बाजीराव खाडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खाडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने पक्षाने त्यांच्यावर पक्षशिस्तभंगाची कारवाई केली आहे. आपले कृत्य पक्ष शिस्तीचा भंग करणारे असल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खाडे यांना पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – NCP राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ‘तुतारी’चा वाद राजकीय फायद्यासाठी)

विशाल पाटील यांना काँग्रेसने दिला पक्षशिस्त पाळण्याचा सल्ला

दरम्यान, कोल्हापुरात बंडखोर उमेदवारावर कारवाई करणाऱ्या काँगेसने सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्याबाबतीत आस्ते कदम भूमिका घेतली आहे. सांगलीची जागा पदरात पाडण्यात अपयश आल्याने काँग्रेसने स्थानिक नेत्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी काँग्रेसने विशाल पाटील यांना पक्षशिस्त पाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, विशाल पाटील आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले आहेत. (Lok Sabha Election 2024)

विशाल पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या मागणीनुसार काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यावर कारवाई अपेक्षित होती. मात्र, विशाल पाटील यांना निवडणूक चिन्ह मिळून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तरीही काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याने ठाकरे गटात आश्चर्य व्यक्त होत आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.