प्रशांत किशोर यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट? Sunil Tatkare यांनी स्पष्टच सांगितले…

मतमोजणीच्या दिवशी रायगड लोकसभा मतदारसंघ हारणार असे अनेकजण सांगत होते. मला काही रणनितीकार, सर्व्हेची गरज नाही. मी फिल्डवरचा आहे. गावाला गेल्यावर माणसांना, तरुणांना भेटल्यावर काय वाटते याचा अनुभव आहे, असेही ते (Sunil Tatkare) म्हणाले.

74
प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार, आणि सुनील तटकरे यांचा एकत्रित फोटो.
प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा.

राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची नियुक्ती करण्यावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे. भाजपाने यावरुन नाराजी जाहीर केल्याचेही बोलले  जात आहे. तसेच प्रशांत किशोर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भाष्य केले. प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीसंदर्भात आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीबाबत विचारले असता ते म्हणाले की, मला यासंदर्भात जास्त माहिती नाही. आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींशी त्यांची सदिच्छा भेट झाली इतकंच माहिती आहे. राजकीय सल्लागार म्हणून त्यांना नियुक्त केल्याची माहिती नाही. मला माहिती नाही याचा अर्थ ही नियुक्ती झालेली नाही. ही फक्त औपचारिक भेट होती असे मला सांगितले. आम्ही सर्वजण थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल आहोत. शरद पवार, अजित पवार, तसेच मला मिळालेले सानिध्य विलासराव देशमुख, वसंतदादा आम्ही सगळे प्रॅक्टिकल काम करणारे आहोत. मी माझ्या आयुष्यात निवडणुकीचा सर्व्हे कधी करुन घेतलेला नाही. मतमोजणीच्या दिवशी रायगड लोकसभा मतदारसंघ हारणार असे अनेकजण सांगत होते. मला काही रणनितीकार, सर्व्हेची गरज नाही. मी फिल्डवरचा आहे. गावाला गेल्यावर माणसांना, तरुणांना भेटल्यावर काय वाटते याचा अनुभव आहे, असेही ते (Sunil Tatkare) म्हणाले.

पुढे त्यांनी (Sunil Tatkare) सांगितले की, मी 8 वेळा महाराष्ट्र उलथापालथा केला आहे. महाराष्ट्राचा कानाकोपरा माहिती आहे. ते रणनितीकार आमच्या पक्षासाठी काम करतात की कल्पना नाही. सुनेत्रा पवार आणि त्यांची भेट नक्की झाली. दीड महिन्यापूर्वीही आमची भेट झाली. पण ती सदिच्छा भेट होती. आम्ही पक्षाचे संघटन राज्यात बांधत असताना  प्रॅक्टिकल असल्याने शेतकऱ्यांना, उद्योजकांना काय हवे आहे याचा अनुभव असल्याने त्यानुसार बांधणी करत आलो. आता कोणाचा सल्ला मिळाला तर ठीक आहे. सदिच्छा भेट झाली म्हणजे नेमले असे होत नाही. पार्थ पवार होते तर ते अधिक सांगू शकतील. भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएत आहोत. आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचं मी वारंवार अधोरेखित केले आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही एनडीएसोबत आहोत, राहणार असेही त्यांनी (Sunil Tatkare)  सांगितले.

(हेही वाचा Punjab Election २०२७ मध्ये भाजपची अकाली दलासोबत पुन्हा होणार युती? सुखबीर सिंग यांची पंतप्रधानांसोबत बैठक)

सर्व्हे करणे यात गैर नाही

कोणताही राजकीय पक्ष सर्वे करुन घेत असतो. त्यातून एक अंदाज येत असतो. 2014 ला मी प्रदेशाध्यक्ष झालो. 2014 ची निवडणूक आव्हानात्मक होती. चारही पक्ष स्वतंत्र लढत होते. त्यावेळी आमच्यावर मोठे आरोप झाले होते. त्यावेळी आम्ही 41 जागा जिंकलो. 2019 मध्ये 57 जागा जिंकल्या. शरद पवारांना एका तालुक्यातील 10-15 लोकांच नावं माहिती आहेत. सर्व्हे करणं यात गैर नाही. ढोबळ मनाने अंदाज येत असतो. पण प्रॅक्टिकल असल्याने अनुभव आणि सर्व्हेचा ताळमेळ घालत य़श कसं मिळेल याचा प्रयत्न होते. मागील वेळीही सर्व्हे झाला. पण लोकसभा निवडणुकीत आम्हालाही अपयश आलं आणि एनडीएलाही महाराष्ट्रात कमी जागा मिळाल्या. त्यावेळी दादांसोबत महाराष्ट्र फिरलो. डिझान बॉक्सने काय थीम केली असेल. पण त्या थीमवर, सल्ल्यावर यश मिळत नाही. तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी असावी लागते. दादा, आम्ही फिरत होते. त्यानंतर स्ट्राइक रेट वाढला,” असं ते (Sunil Tatkare)  म्हणाले.

वहिनी आणि आमचा कोअर ग्रुप नेहमी संपर्कात असतो. आमच्या बैठका होत असतात. अधिवेशन सुरु असल्याने प्रत्यक्ष भेटी झाल्या नाहीत. फोनवरुन संपर्कात असतो. आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेत असतो. ते राजकीय सल्लागार नेमल्याचे मला माहिती नाही. मला माहिती नाही म्हणजे नेमलेले नसावेत, असेही त्यांनी अधोरेखित केले. राज्य नेतृत्वाबाबत सल्ला घेण्याचा प्रश्न येत नाही. एमडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोप्यात मेहनत घेतली आणि यश प्राप्त केले. त्यामुळे पक्षांतर्गत दोन मतप्रवाह गैरवाजवी आहे असंही त्यांनी (Sunil Tatkare)   सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.