हल्ल्याआधी मिटींग, नागपूरहून आला फोन…सदावर्तेंबाबत न्यायालयात धक्कादायक खुलासे

118

वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात सुनावणी झाली, सुनावणीच्या वेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मोठमोठे खुलासे केले. यामध्ये शरद पवारांच्या घरावर चाल करून जाण्याचा कट कसा शिजला त्याची माहिती घरत यांनी न्यायालयाला दिली आहे. सदावर्ते मुद्दाम या घटनेच्या वेळेस न्यायालयात गेले होते. सदावर्ते यांचा विजयोत्सव बारामतीत साजरा करण्याची मिटींग झाली होती. घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 वाजता नागपूर मधून व्हॉटअॅप कॉल आला होता, त्यानंतर सारी जमवाजमव सुरु झाल्याचा दावा घरत यांनी केला आहे.

असा शिजला कट!

अभिषेक पाटील, सविता पवार, मोहम्मद शेखसह चौघांनी सिल्वर ओकची रेकी केली होती. या प्रकरणी ४ नवीन लोकांना अटक केली आहे तर एकाच शोध सुरु असल्याचे घरत यांनी न्यायालयात सांगितले. नागपूर कॉल नंतर पत्रकार पाठवा, असा मेसेज आला होता. यानंतर पत्रकारांना फोनाफोनी झाली आणि आंदोलनावेळी बोलविण्यात आले. दुपारी 2.42 काही पत्रकारांनाही कॉल झाले. हा सुनियोजित कट होता, असा दावा घरत यांनी करताना मोहम्मद शेखने व्हॉट्सअॅप मेसेजचा त्यांनी हवाला दिला. यामध्ये शेखने सावधान शरद …शरद  असे बॅनर तयार करण्यात आल्याचा उल्लेख केल्याचे म्हटले आहे. या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहे, आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यामुळे वाढीव कोठडीची आवश्यकता आहे, असेही घरत यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढणार?)

सातारा पोलिसांनीही सदावर्तेंचा मागितला ताबा

वकील गिरीश कुलकर्णी यांनी सदावर्ते यांची बाजू मांडली. सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सातारा पोलीस अधिकारी भगवान निंबाळकर त्यांच्या पथकासह गिरगाव न्यायालयात हजर झाले. सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मागितला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वकील सदावर्तेंवर साताऱ्यात गुन्हा दाखल आहे, या प्रकरणी त्यांचा ताबा मागणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.