कोविडमुळे निधन झालेल्यांना मिळणा-या नुकसान भरपाईची कालमर्यादा निश्चित

105

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जाहीर केल्याप्रमाणे कोविड-19 कारणामुळे निधन झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई  देण्यासंबंधीचे दावे दाखल करण्यासाठी  सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा निश्चित केली आहे. 2021 मध्ये दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका सी क्रमांक 539 मधील विविध अर्ज क्रमांक 1805 विषयी न्यायालयाने 24 मार्च 2022 रोजी यासंबंधी आदेश दिला आहे.

90 दिवसांत नुकसान भरपाईचा दावा

कोविड-19 मुळे जर कोणाचा 20 मार्च 2022 पूर्व मृत्यू झाला असेल, तर त्यासंबंधी नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्यासाठी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दि. 24 मार्च, 2022 पासून पुढे 60 दिवसांची कालमर्यादा लागू असणार आहे. आगामी काळात कोविड-19 मुळे मृत्यू झाल्यास, त्या तारखेपासून 90 दिवसांच्या कालावधीमध्ये नुकसान भरपाईचा दावा करता येणार आहे. संबंधितांनी नुकसान भरपाईचा दावा केलेल्या तारखेपासून त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे कार्य तीस दिवसांच्या कालावधीत होऊन, प्रत्यक्ष नुकसान भरपाईची रक्कम देण्यासंबंधी यापूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

( हेही वाचा: रात्री दहानंतर मशिदींवरील भोंगे वाजले तर…भोंग्यांच्या वादात आता करणी सेनेची उडी! )

शिक्षेच्या कारवाईला पात्र ठरणार

अतिशय अवघड परिस्थितीत जर दावेदार दिलेल्या काळामध्ये नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करू शकला नाही, तर त्या दावेदाराने तक्रार निवारण समितीकडे जावे. दावेदाराला तक्रार निवारण समितीमार्फत दावा दाखल करण्याचा मार्ग खुला आहे. याशिवाय, बनावट दाव्यांची जोखीम कमी करण्यासाठी दाव्यांपैकी पाच टक्के अर्जांची छाननी पहिल्याच टप्प्यात करण्यात यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर जर कोणी खोटा दावा सादर केल्याचे आढळून आले, तर डीएम कायदा 2005 कलम 52 अन्वये त्याचा विचार केला जाणार असून, संबंधित शिक्षेच्या कारवाईस पात्र ठरणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.