संजय राऊतांना आरे-तुरे आणि आदित्य ठाकरेंना ‘सोन्या’; शिवसेना वर्धापनदिनी मंत्री Gulabrao Patil कडाडले

60
गुलाबराव पाटील शिवसेना वर्धापनदिनाच्या भाषणात
गुलाबराव पाटील शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भाषण करत आहेत.

शिवसेनेच्या साठाव्या वर्धापनदिनाच्या (Shivsena 60th anniversary) ऐतिहासिक सोहळ्यात राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत आक्रमक भाषण करत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर शद्बिक प्रहार केला. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडलेल्या या मेळाव्यात त्यांनी जुन्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी आपल्या खास वैदर्भीय आणि अहिराणी शैलीत विरोधकांचा समाचार घेताना, पक्ष फुटण्याला कारणीभूत ठरलेल्या अंतर्गत बाबींवर जाहीरपणे भाष्य केले. (Gulabrao Patil)

(हेही वाचा – Dombivli च्या कुख्यात स्वीट ड्रीम बारवर चौथ्यांदा कारवाई; बारबालांसह ३२ जणांवर गुन्हा)

संजय राऊतांवर एकेरी भाषेत घणाघात
‘एकनाथ शिंदे कोण आहे, ते एक टायगर आहेत. हे महाराष्ट्रात आणि देशात सिद्ध झाले. त्यावेळी ४० रेडे मुंबईत आले तर कापू असा इशारा देण्यात आला पण, आम्ही मुंबईत आलो आणि सत्ता स्थापन केली. ऑपरेशन टायगरवरुन काल देखील शिवीगाळ करण्यात आली’, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. “राऊत तुम्हाला मराठीत बोलता येते पण, माझी अहिराणी शिवी ऐकली तर चार दिवस जागेवरुन उठणार नाही”, असे म्हणत पाटलांनी राऊतांचा ऐकेरी उल्लेख केला. बाळासाहेबांचा आत्मा यावेळी एकनाथ शिंदेंना शिवसेना वाचवली म्हणून आशिर्वाद देत असेल, असे पाटील म्हणाले. (Gulabrao Patil)

(हेही वाचा – Nagpur : देशाच्या संरक्षण उत्पादनात महाराष्ट्राचे मोठे योगदान; नागपूरमध्ये स्वदेशी ब्रह्मोस वॉरहेडची निर्मिती)

आदित्य ठाकरेंचा ‘सोन्या’ म्हणून उल्लेख
आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना पाटलांनी त्यांचा उल्लेख ‘सोन्या’ असा केला. ते म्हणाले की, केवळ पैशाच्या बळावर लोकप्रतिनिधी फितूर झाल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. जेव्हा तुमचे वडील राज्याचे प्रमुख होते, तेव्हा जर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असता, आमदारांमधील नाराजी समजून घेतली असती आणि एकनाथ शिंदे यांना सन्मानाची वागणूक दिली असती, तर आज ही वेळ आली नसती. दुसरीकडे, श्रीकांत शिंदे हे संपूर्ण राज्याचा दौरा करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.