Grampanchayat Election 2023 : ग्रामपंचायत निवडणुकीत उबाठाचा का झाला पराभव? भाजपने सांगितले कारण…

89

ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Grampanchayat Election) निकालात भाजप हाच पक्ष नंबर वन ठरला आहे. तसेच या निवडणूक महायुतीने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. या निकालानंतर भाजपने उबाठावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले आशिष शेलार? 

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने झिडकारले आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी केलेली प्रतारणा महाराष्ट्राला मान्य नाही. उद्धव ठाकरेंनी बदलेले विचार आणि मतांसाठी सुरु केलेले लांगुलचालन याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने लाथ मारली आहे. उद्धव ठाकरेंनी केलेली काँग्रेसशी युती, राम मंदिर, रामजन्मभूमी, त्यासाठीची वर्गणी याची केलेली चेष्टा हे मराठी माणसाला न आवडल्याचे Grampanchayat Election निकालांमधून स्पष्ट दिसत आहे, असे भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले. नाना पटोलेंना खुमखुमी असेल तर माझे थेट आव्हान आहे. त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि तिथे पोटनिवडणूक घेऊन दाखवावी. नाना पटोलेंना भाजपा आणि महायुती त्यांना चारी मुंड्या चीत करुन दाखवेल. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी मराठीत म्हण आहे तशीच आत्ता नाना पटोलेंची अवस्था आहे, असेही शेलार म्हणाले.

(हेही वाचा Gram panchayat Election Result : महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीत तेलंगणातील बीआरएसची एन्ट्री)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.