Virat Kohli : विराटचा वाढदिवस ड्रेसिंग रुममध्ये ‘असा’ झाला साजरा

124

ऋजुता लुकतुके

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय, (Virat Kohli) विराट कोहलीचा ३५ वा वाढदिवस आणि विराटचं शतक तसंच रवी जाडेजाचे पाच बळी अशा सगळ्या चांगल्या गोष्टी रविवारी (५ नोव्हेंबर) भारतीय संघाच्या बाबतीत घडल्या. आणि मोठ्या विजयानंतर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये त्यासाठी केक कापून आनंदही साजरा करण्यात आला.

या सेलिब्रेशनच्या केंद्रस्थानी अर्थातच, ४९ एकदिवसीय शतकं पूर्ण करणारा आणि उत्सवमूर्ती (Virat Kohli) विराट कोहलीच होता. त्यानेच सगळ्यात आधी केक कापला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह तसंच खजिनदार आशीष शेलार असे बीसीसीआयचे सगळे अधिकारी या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.

आपणही हा व्हीडिओ पाहूया…

भारतीय संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी दणदणीत पराभव करत गुणतालिकेत पूर्ण वर्चस्व मिळवलं आहे. पहिली फलंदाजी (Virat Kohli) करताना भारताने ५ बाद ३२६ धावा केल्या. यात विराटच्या नाबाद १०१ धावांबरोबरच श्रेयस अय्यरच्या ७८ धावांचंही मोठं योगदान होतं. त्यानंतर रवींद्र जाडेजाने ५ बळी टिपत गोलंदाजीची धुरा वाहिली. आणि भारताचा मोठा विजय साकार झाला.

भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी (१२ नोव्हेंबर) नेदरलँड्सबरोबर होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.