उदयनराजे यांच्या ‘त्या’ पत्राची राष्ट्रपतींकडून दखल, काय म्हटलंय पत्रात?

102

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणा-या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी असल्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले होते. यानंतर आक्रमक भूमिका घेत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र लिहिले. त्यामध्ये राज्यपालांना हटवण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली. त्यांच्या या पत्राची राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

(हेही वाचा – मध्य रेल्वेकडून प्रवाशांना नववर्षाचे गिफ्ट! कोकणासह विदर्भासाठी धावणार ४२ विशेष गाड्या, पहा संपूर्ण वेळापत्रक)

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांचा निषेध म्हणून रायगडावर आत्मक्लेश आंदोलन केले. तर सकाळीच त्यांनी रायगडावर जिजाऊ माँ साहेब समाधीचे दर्शन घेतले आणि शनिवारी आंदोलन करत सभा घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. यावेळी शिवप्रेमींशी आणि माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राष्ट्रपतींनी आपल्या पत्राची दखल घेतली असून त्याचे उत्तर आल्याची माहिती दिली. आजच मला पत्रं आले. त्यात माझ्या पत्राची दखल घेण्यात आल्याचे सांगितले आहे. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवले आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हटलंय उदयनराजे यांनी पत्रात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी अवमानकारक विधान केले. त्यामुळे मलाच नाही तर राज्यातील संपूर्ण जनतेला वेदना झाल्यात. राज्यपालांचे ते विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. यापूर्वी देखील असे विधान त्यांनी केले होते. अशा विधानामुळे समाजात अस्वस्था निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही या विधानाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असेही उदयनराजे यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.