नितीन गडकरींच्या नावाने ‘फेक पोस्ट’ व्हायरल! पोलिसात तक्रार दाखल

112

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावाने सोशल मीडियामध्ये ‘फेक पोस्ट’ व्हायरल करण्यात आली आहे. तथ्यहिन पोस्टची नितीन गडकरींच्या कार्यालयाने गंभीर दखल घेत नागपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

( हेही वाचा : गडकिल्ल्यांवरील इस्लामिक अतिक्रमण हे अधार्मिकच – रणजित सावरकर)

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली आहे. परंतु, महाराष्ट्रातील पुण्याच्या कसबापेठ येथील पोटनिवडणुकीत पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने सोशल माध्यमांवर तथ्यहीन पोस्ट ‘व्हायरल’ करण्यात येत आहे. यासंदर्भात गडकरींच्या कार्यालयाकडून नागपूर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

समाज माध्यमांवर गडकरींच्या नावाखाली व्हॉट्सअपवर दिशाभूल करणारी वक्तव्ये फॉरवर्ड केली जात आहेत. ही बाब नितीन गडकरींच्या कार्यालयाने गंभीरतेने घेतली असून नागपूर पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. नितीन गडकरींचे नाव वापरून अशा प्रकारे खोट्या व तथ्यहीन पोस्ट व बातम्या पसरविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.