मुंबई काँग्रेस मधील भाकरी परतवणार वर्षा गायकवाड!

171
मुंबई काँग्रेस मधील भाकरी परतवणार वर्षा गायकवाड!
मुंबई काँग्रेस मधील भाकरी परतवणार वर्षा गायकवाड!

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यांच्याबद्दलची पक्षातील नाराजी आता उघड होऊ लागली आहे. पक्षातील या नाराजांमुळे गायकवाड काँग्रेसमध्ये जुन्या शिलेदारांना सोबत पुढे घेऊन जात पक्षाची बांधणी करणे अशक्यच आहे. त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांनीही मुंबई काँग्रेसमध्ये भाकरी परतवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्या समर्थकांची वर्णी जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष तसेच इतर सेलच्या अध्यक्ष पदी लावण्याच्या विचार असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेस पक्षाने मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना पदावरून दूर करत त्यांच्या जागी माजी शालेय शिक्षण मंत्री आणि धारावीतील आमदार वर्षा गायकवाड यांची वर्णी लावली आहे. मात्र वर्षा गायकवाड या हे पद भूषवण्यासाठी समर्थ नसल्याची पूर्ण कल्पना असतानाही पक्षाने मात्र एक निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. मात्र वर्षा गायकवाड यांच्यावर ही जबाबदारी सोपवताना पक्षाने माजी महापौर आणि माजी मंत्री राहिलेल्या चंद्रकांत हंडोरे यांच्यावर अविश्वास दाखवला आहे.

विधान परिषद निवडणुकीत पहिल्या क्रमांकाची मते देऊन हंडोरे यांना निवडून आणण्यात येणार होते. परंतु आयत्या वेळी ही मते भाई जगताप यांच्या पारड्यात पडली आणि हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला. हंडोरे यांच्या या पराभवामुळे दलित बांधवांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. त्यामुळेच मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पद हंडोरे यांच्याकडे जाईल असे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात वर्षा गायकवाड यांची या वर्णी मुंबई अध्यक्ष पदी लावून काँग्रेसने हंडोरे यांना कात्रजचा घाट दाखवला आहे. त्यातच वर्षा गायकवाड यांच्या त्या नियुक्तीनंतर खुद्द हंडोरे नाराज आहेतच. शिवाय मुंबई प्रदेश काँग्रेसचे राजन भोसले, जिल्हाध्यक्ष वीरेंद्र उपाध्याय, मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह यांच्यासह काही पदाधिकारी मंडळी नाराज आहेत.

(हेही वाचा – कुर्ला परिसरात आता घरोघरी बांधता येणार शौचालय, कारण…)

त्यामुळे या नाराज टीमच्या विचार न करता वर्षा गायकवाड यांनी आता पक्षाची बांधणी नव्याने करण्यासाठी भाकरी पलटवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि याच अनुषंगाने त्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी महत्त्वाच्या पदांवर लावण्याचा निर्धार केला आहे. जेणेकरून समर्थकांना मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये सक्रिय करून काँग्रेसचे मोट पुन्हा एकदा मुंबईत बांधण्याचा त्यांच्या विचार आहे असं बोललं जात आहे. मुंबई काँग्रेसने कायमच काँग्रेसवर विश्वास दाखवला असून त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा विचारात घेऊन पक्षाने त्यांच्या रूपाने असलेला काँग्रेसचा बालेकिल्ला न जाण्याचा विचार ही खेळी खेळली.

परंतु काँग्रेसचे माजी मंत्री मालाडचे आमदार अस्लम शेख यांचाही तेवढाच दावा होता. पण आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम नेत्याच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढल्यास पक्षाला मोठे नुकसान सोसावे लागेल यासाठी हे दलित कार्ड वापरण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना पक्ष आधी फुटला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. त्यामुळे काँग्रेस पक्षाला धोका निर्माण झाला असून जुन्या प्रस्तापित पदाधिकारी यांच्यावर अवलंबून न राहता नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार वर्षा गायकवाड यांनी अध्यक्ष म्हणून केला असल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.