कुर्ला परिसरात आता घरोघरी बांधता येणार शौचालय, कारण…

217
कुर्ला परिसरात आता घरोघरी बांधता येणार शौचालय, कारण...

कुर्ला पूर्व येथील व्ही.एन. पुरव मार्ग आणि चुनाभट्टी येथील वसंतराव नाईक मार्ग जंक्शनपासून ते राहुल नगर नाला पर्यंत ४०० मि.मी. व्यासाची मलनि:सारण वाहिनी आता टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात मलनि:सारण वाहिनीअभावी शौचालयांचा जो मल टाकीत अथवा उघड्या नाल्यांमध्ये सोडला जात होता, तो आता मलवाहिनीद्वारे वाहून नेला जाणार असल्याने या विभागातील जनतेला आता घरोघरी शौचालय बांधण्याचेही स्वप्न पूर्ण होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्पांतर्गत कुर्ला पूर्व येथील व्ही.एन. पुरव मार्ग व चुनाभट्टीतील वसंतराव नाईक मार्ग, राहुल नगर आदी भागांमध्ये जिथे मलवाहिन्यांचे जाळे नाही, तिथे आता मलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी व्ही.एन. पुरव मार्गासह नाईक मार्ग जंक्शन ते राहुल नगर नाला पर्यंत मलवाहिनी टाकल्यामुळे या सभोवतालच्या परिसरातील मलनि:सारण समस्येचे निराकरण होईल तसेच या मलवाहिनी व्यवस्थेचा लाभही त्यांना मिळेल. आणि पर्यायाने येथील नागरिकांचे दैनंदिन जनजीवन आरोग्यदायी बनण्यास मदत होईल,असा विश्वास मलनि:सारण प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जुलै २०१९मध्ये मुंबईत क्षेत्रात महापालिकेला कालबध्द पध्दतीने मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे वाढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले असून या कामाच्या प्रगतीचे अवलोकन करण्याचे निर्देशही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने मलवाहिन्यांचे जाळे अधिक वाढवण्याच्या कामाला गती दिली आहे.

व्ही.एन. पुरव मार्ग आणि चुनाभट्टीतील नाईक मार्ग जंक्शन ते राहुल नगर नालापर्यंत टाकण्यात येणाऱ्या मलवाहिनींबरोबरच कुर्ला पूर्व येथील शिवसृष्टी रोड आणि चेंबूर जवळील उमरशी बाप्पा चौक, एस.जी.बर्वे मार्ग येथेही प्रत्येकी १२०० मि.मी. व्यासाची मलवाहिनी टाकली जाणार आहे.

या सर्व ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या मलवाहिनींच्या कामांच्या आड कुठेही झोपडपट्टी परिसर नाही की भराव टाकलेली जमिन. तरीही या मलवाहिनी टाकण्याचा दर महापापालिकेने अंदाजित केलेल्या ५. २८ कोटी रुपयांच्या तुलने २२. ५० टक्के अधिक लावून हे काम मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटाघाटीअंती कंत्राटदाराने अखेर साडे सात टक्के दर कमी करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे २२. ५० टक्के ऐवजी सुमारे १५ टक्के अधिक दरात कंत्राटदाराने काम मिळवले. या कामासाठी महापालिकेने सर्वांत कमी दर आकारणाऱ्या समृध्दी एंटरप्रायझेस या कंपनीची निवड केली. त्यामुळे यासर्व कामांवर विविध करांसह ७ कोटी ६८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

(हेही वाचा – Heavy Rain : हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर; IMD कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

या भागांत अशाप्रकारे टाकल्या जाणार मलवाहिनी

व्ही.एन. पुरव मार्ग व चुनाभट्टीतील नाईक मार्ग जंक्शन ते राहुल नगर

मलवाहिनींचा व्यास : ४०० मि.मी

मलवाहिनींनी लांबी : ३०० मीटर

मलवाहिनीची खोली : ५.३८ मीटर

गटार प्रवेशिकांची संख्या : १५

कुर्ला पूर्व येथील शिवसृष्टी रोड

मलवाहिनींचा व्यास : १२०० मि.मी

मलवाहिनींनी लांबी : ३००मीटर

मलवाहिनीची खोली : ९.७ मीटर

चेंबूर जवळील उमरशी बाप्पा चौक, एस.जी.बर्वे मार्ग

मलवाहिनींचा व्यास : १२०० मि.मी

मलवाहिनींनी लांबी : ६० मीटर

मलवाहिनीची खोली : ७. १५ मीटर

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.