‘नमस्कार करू का?’, शिंदेंनी भर सभागृहात फडणवीसांना विचारलं आणि…

81

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाला अखेर सोमवारी पूर्णविराम लागला. शिंदे-भाजप युतीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकून आपल्या सत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात अभिनंदनपर भाषण केले. या भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

(हेही वाचाः अजित पवार म्हणतात, देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान आमदार)

काय झाले नेमके?

बहुमत चाचणी जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले असून एकनाथ शिंदे हे या सरकारचे मुख्यमंत्री असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘नमस्कार करू का?’, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यानंतर फडणवीसांनी परवानगी दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उभे राहिले व हात जोडत त्यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्विकारल्या. एकनाथ शिंदे यांच्या या कृतीमुळे त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली.

(हेही वाचाः ‘हो! हे आमदार ED मुळेच इथे आले आहेत पण…’,काय म्हणाले फडणवीस?)

शिंदे-भाजप सरकारचा विजय

शिंदे-भाजप आघाडीने 164 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता शिंदे-भाजप सरकारला अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे. रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाल्यामुळे शिंदे-भाजप सरकार बहुमत चाचणीत देखील यशस्वी होईल, हे जवळजवळ स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणे सोमवारी झालेल्या बहुमताच्या चाचणीत देखील शिंदे-भाजप सरकारने विजय संपादन केला आहे.

(हेही वाचाः ‘मी आलो आणि यांना घेऊन आलो’, फडणवीसांचा मविआला टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.