Eknath Shinde: राहुल गांधींकडून हिंदु धर्मातील साडेतीन शक्तिपीठांचा अपमान, एकनाथ शिंदेंचा आरोप

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईत 'इंडि' आघाडीची झालेली सभा म्हणजे एक प्रकारे फॅमिली गॅदरिंग होते. स्टॅलिन यांनी हिंदू धर्माचा अपमान केला, राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा अपमान केला, अशा लोकांसोबत बसण्याची वेळ काही लोकांवर आली, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.

142
महायुती जिंकणार म्हणून विरोधकांच्या छातीत धडकी भरलीय; CM Eknath Shinde यांची टीका

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त समारोपाची सभा रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडली. या सभेत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर ते कन्याकुमारीपासून महाराष्ट्र-मुंबईतील दादरपर्यंत केलेल्या प्रवासाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र त्या सभेत राहुल गांधी यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला.

सभेदरम्यान केलेल्या भाषणाची सुरुवात करतानाच राहुल गांधी म्हणाले की, ‘हिंदू धर्मात शक्ती हा शब्द आहे. आम्ही शक्तिशी लढत आहोत.’ पण ‘शक्ती’ हा शब्द हिंदू धर्मातील साडेतीन शक्तिपीठांबाबत वापरला जातो. त्यामुळे राहुल गांधींकडून हिंदु धर्मातील साडेतीन शक्तिपीठांचा अपमान झाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

(हेही वाचा – Indian Premier League : इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्याची तारीख ठरली, कसं कराल ऑनलाईन बुकिंग; वाचा सविस्तर… )

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, मुंबईत इंडि आघाडीची झालेली सभा म्हणजे एक प्रकारे फॅमिली गॅदरिंग होते. स्टॅलिन यांनी हिंदू धर्माचा अपमान केला, राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा अपमान केला, अशा लोकांसोबत बसण्याची वेळ काही लोकांवर आली, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘आपकी बार भाजपा तडीपार’ म्हणणाऱ्यांना लोकांनी आधीच तडीपार केलेले आहे. सभेत आलेल्या नेत्यांना त्यांच्या राज्यातील लोकांनी तडीपार केलेले आहे तसेच हिंदूंचा अपमान करणाऱ्या स्टॅलिन यांच्याबरोबर मला बसावे लागत आहे. काल राहुल गांधी यांच्या सभेचे चित्र एका म्हणी प्रमाणे होते. असे म्हणतात की, ‘कही का इटे, कही से रोडे, भानुमती का कुणबा’ या म्हणी प्रमाणे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक, कोणी बिहार, उत्तरप्रदेश, कोणी काश्मीरमधून जे तडीपार झालेले व हद्दपार लोकांनी केले ते लोक एकत्र आलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर काल सरळ सरळ दिसत होते. म्हणून कालचा दिवस हा काळाचा दिवस आहे, असेच आम्ही म्हणतो.

उबाठा गटाने माफी मागावी…
उबाठा गटाच्या लोकांनी बाळासाहेबांच्या अन् स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुढे नतमस्तक होऊन माफी मागितली पाहिजे. उद्धव ठाकरेंना जर काल ५ मिनिटं बोलायला दिलेले असतील तर त्यांची पत दिसून आलेली आहे. कारण त्यांच्याकडे पक्ष नाही, आमदार नाही, खासदार नाही. जेवढा त्यांचा पक्ष तेवढीच त्यांची पत काल दाखवून दिली गेली आहे. असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात नेहमी, ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ करतात. पण भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी हिंदू हा शब्द उच्चारला नाही. यावरुन लक्षात आलं की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांचं धोरण आणि विचारधारा सोडून दिली आहे. त्यामुळेच आम्हाला त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. काल उद्धव ठाकरे यांनी, ‘अब की बार भाजपा तडीपार’ अशी घोषणा दिली. पण उद्धव ठाकरे यांनाच महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी आणि जनतेने तडीपार केले आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.