साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीची मोठी कारवाई! तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक

175

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देशपांडे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याआधी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली होती.

भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीतील साई रिसॉर्टवरून अनिल परब यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. असे असतानाच या प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचे शासनाकडून निलंबन करत चौकशी सुरू केली होती. पदावर असताना अनियमिततेच्या आरोपाखाली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परबांवर आरोप केला जात आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असे अनिल परबांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.

दरम्यान याप्रकरणात अनिल परब यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, याचिका प्रलंबित असेपर्यंत ईडीच्या कारवाईपासून अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने आता अनिल परबांना तूर्तास अटकेपासून दिलासा दिला आहे. २० मार्चपर्यंत अंतरिम संरक्षण देत तूर्तास कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – Supreme Court Hearing: राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना परत बोलवता येत नाही, शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद)

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.