देवेंद्र फडणवीस वेशांतर करुन शिंदेंना भेटायला जायचे; अमृता फडणवीस यांचा मोठा खुलासा

80

राज्यात सध्या एकनाथ शिंदेंचं सरकार आहे. त्यातच शिंदे गट आणि भाजपच्या युतीच्या या सरकारबाबत बोलताना, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत अमृता फडणवीस यांनी सांगितले की, देवेंद्र हे वेश बदलून शिंदेंना भेटायला जायचे.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, मला माहित होते की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, तसेच कोणतेही पद स्वीकारणार नाहीत. उलट मला याबाबत गर्व वाटत होता. त्यांनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचे हित पाहतात.

मुख्यमंत्र्यांनीही केला होता खुलासा

यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सभागृहातील एका भाषणावर सरकार स्थापनेसंदर्भात अनेक गुपित गोष्टींचा उलगडा केला होता. शिंदे म्हणाले होते की, सत्तांतर काही एका दिवसांत झाले नाही, मी आणि देवेंद्र फडणवीस अंधार झाल्यावर भेटायचो.

( हेही वाचा: LPG Gas Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ )

महाराष्ट्र हिताची कामे होतील

देवेंद्र यांना कायम महाराष्ट्राची सेवा करायला आवडते. ते कायम तेच काम करत आले आहेत. याआधी ते आमदार असताना, त्यानंतर मुख्यमंत्री असताना, विरोधी पक्षनेते असताना त्यांनी कायम जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला. आता ते सत्तेत आले आहेत, तर ते आताही जनतेच्या सेवेसाठी कायम कार्यरत असतील याचा मला विश्वास आहे. एकनाथ शिंदेदेखील 24 तास जनतेच्या सेवेसाठी तयार असतात. त्यामुळे हे दोघे मिळून जरुर महाराष्ट्र हिताची कामे करतील, याची मला खात्री आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.