‘हो! हे आमदार ED मुळेच इथे आले आहेत पण…’,काय म्हणाले फडणवीस?

81

बहुमत चाचणीत विजय झाल्यामुळे शिंदे-भाजप सरकारचा विजय झाला आहे. त्यामुळे अभिनंदनपर भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करतानाच महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला आहे. हे सर्व आमदार ED च्या भीतीने इथे आमच्यासोबत आल्याचे विरोधक बोलत आहेत. ते खरं आहे पण ती ED म्हणजे Eknath आणि Devendra आहे असे म्हणत फडणवीसांनी मविआचा समाचार घेतला.

ही ईडी म्हणजे…

आपण सगळे हे राजकीय विरोधक आहोत पण एकमेकांचे शत्रू नाही. विरोधी गटातले काही लोक शिंदे गटातील लोकांविरोधात ईडीची घोषणाबाजी करत होते. हे खरंच आहे हे सर्व आमदार ईडीमुळेच इथे आले आहेत. फक्त ती ED म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र असल्याचे म्हणत फडणवीसांनी मविआवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः ‘मी आलो आणि यांना घेऊन आलो’, फडणवीसांचा मविआला टोला)

मी नशिबवान आहे

राजकारणात दोन्ही बाजू असतात. हनुमान चालिसा म्हटल्यामुळे महिला खासदारावर गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. पण मी नशिबवान आहे. मी रोज सरकारच्या विरोधात बोलत होतो तरी माझं घर तोडायचा स्कोप नव्हता, कारण मुंबईत माझं घरच नाही, मी सरकारी घरात राहतो, असे म्हणत फडणवीस यांनी मविआला टोला लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.