Lok Sabha Election 2024: कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे, तर ठाण्यात नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब

77
Lok Sabha Election 2024: कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे, तर ठाण्यात नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब

शिंदे गटाकडून अखेर कल्याणमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीमधील ठाण्याच्या जागेबाबतचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेनेकडून अधिकृत ट्विट खात्यावर याबाबत घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली होती, तर ठाणे लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. (Lok Sabha Election 2024)

शिंदे गटाकडून याबाबत ट्विटरवर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ‘लोकसभा निवडणूक -२०२४’ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा!’, असे ट्विट शिंदे गटाकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचा –Maharashtra Day 2024 : पासष्टावा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना )

ठाणे लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या घरी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. यानंतर उमेदवार निवडण्याचा सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. उमेदवार कोणी असो, सर्व ताकद लावली जाणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिले, त्यानंतर नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे, तर नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. २ वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून नरेश म्हस्के एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री ठाण्यात असताना नरेश म्हस्के हे नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या शेजारी दिसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यातून आहेत. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून राजन विचारे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे, तर कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. श्रीकांत शिंदे हे आपल्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच प्रचाराला लागल्याचे चित्र आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.