ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा अन्यथा देसाई, रावतेंना करायचे होते मुख्यमंत्री!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचाराचे सोनं लुटले जायचे. पण काल त्यांना गरळ ओकताना पाहिले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

94

उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वाकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावे. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचे होते. मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावे लागले? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचे नव्हते. राज ठाकरेंना पक्षातून का जावे लागले? त्यामुळे दोष देणे थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणे गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी केला.

सेना वरपास!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचाराचे सोनं लुटले जायचे. पण काल त्यांना गरळ ओकताना पाहिले. जनतेने भाजपला नाकारले नाही. काँग्रस, राष्ट्रवादीला नाकारले. शिवसेनेला वरपास केले याचे त्यांना विस्मरण झाले आहे. आम्ही 70 टक्के जागा जिंकल्या. तुम्ही 45 टक्के जागा जिंकल्या. तुम्हाला जनतेने नाकारले. हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे, असे ते म्हणाले.

(हेही वाचा : दसरा मेळाव्यात कदमांच्या विरोध घोषणाबाजी…आधीही आणखी एका सेना नेत्याला झालेला विरोध!)

महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही!

मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. कोलकाताची आजची व्यवस्था काय आहे हे माहीत आहे का? जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकावयाचे आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप जिवंत आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. काय वाटेले ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.