अजित पवारांसह नातलगांच्या बेहिशेबी मालमत्तेची ‘टोटल’ लागली! किती आहे आकडा?

७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी छापेमारी करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने त्यांच्या लेखी पत्रात दिली, जे पत्र भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले. 

98

तब्बल एक आठवडा आयकर विभाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचा बहिणींच्या घरावर, कार्यालये, साखर कारखाने यांवर छापेमारी करत होते. त्यावेळी ‘पाहुणे घरी आहेत, आम्ही काही केलेच नाही, तर घाबरायाचे कशाला’, असे अजित पवार म्हणत होते. तर शरद पवार ‘आम्हाला पाहुण्यांची भीती नाही’, असे म्हणाले होते. त्याच पाहुण्यांनी आता अजित पवारांसह त्यांच्या नातलगांच्या बेहिशेबी मालमत्तेची एकूण टोटल केली आहे. या छापेमारीतून सुमारे १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे.

एकूण ७० ठिकाणी छापेमारी!

आयकर विभागाने साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यासोबतच दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई केली. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे आहेत. याशिवाय मुंबईच्या दोन रिअल इस्टेट व्यवसाय समूहांवरही कारवाई केली. ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी छापेमारी करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने त्यांच्या लेखी पत्रात दिली, जे पत्र भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले.

(हेही वाचा : ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा अन्यथा देसाई, रावतेंना करायचे होते मुख्यमंत्री!)

अशी जमवली मालमत्ता!

छापेमारी दरम्यान गोळा केलेल्या पुराव्यामुळे प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. दोन्ही व्यवसाय समुहांकडून सुमारे १८४ कोटीच्या बेहिशेबी उत्पन्नाचा पुरावा देणारी धक्कादायक कागदपत्रे सापडली आहे, तसेच २.१३ कोटींची बेहिशेबी रोकड आणि ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कंपन्यांचे काही आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचेही पत्रात म्हटले आहे. बोगस शेअर प्रिमिअम, असुरक्षित कर्ज, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यासोबत सौदे काही रक्कम मिळवल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या पैशांचा उपयोग विविध मालमत्तांच्या खरेदीसाठी केला गेला आहे. या पैशांचा वापर करून मुंबईतील एका मुख्य ठिकाणी कार्यालय इमारत, दिल्लीतील उच्चभ्रू परिसरात फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतजमीन घेण्यात आली, तसेच साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. या सर्व मालमत्तेची किंमत १७० कोटी रुपयापर्यंत आहे, असे आयकर विभागाने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.