नवाब मलिकांचा एनसीबीवर ट्विटद्वारे नवा आरोप! कुणाचे घेतले नाव?

प्रत्येक वेळी नवीन नावाचा उलगडा करणाऱ्या मलिकांनी शनिवारी ट्विटद्वारे फ्लेचर पटेल या नव्या नावाचा उल्लेख करून चर्चा सुरू केली आहे.

63

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक होताच एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर एकामागोमाग एक नवनवीन आरोप करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक वेळी नवीन नावाचा उलगडा करणाऱ्या मलिकांनी शनिवारी ट्विटद्वारे फ्लेचर पटेल या नव्या नावाचा उल्लेख करून चर्चा सुरू केली आहे. या फ्लेचर पटेलचा एनसीबीशी काय संबंध आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत करत लवकरच याची माहिती जाहीर करू, असेही मलिक म्हणाले.

एकीकडे एनसीबीने केलेल्या कारवाईवरुन खळबळ माजली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोपांनी खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांनी आतापर्यंत दोन वेळा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले. या कारवाईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे त्यांनी उघड केले आहे. या सर्व घडामोडीत त्यांनी एक ट्वीट केले असून पुन्हा एकदा एनसीबीला उघडे पाडण्याचा इशारा दिला आहे.

(हेही वाचा : अजित पवारांसह नातलगांच्या बेहिशेबी मालमत्तेची ‘टोटल’ लागली! किती आहे आकडा?)

काय म्हटले नवाब मलिक यांनी?

नवाब मालिकांनी एनसीबीवर हल्लाबोल सुरु केल्यानंतर त्यांनी त्यांचा जावई समीर खान याच्यावर एनसीबीने केलेली कारवाई आणि लावलेले आरोप हे चुकीचे असल्याचे म्हटले होते. आता त्या आरोपांच्या मालिकेत भर पडली आहे. मलिक यांच्या यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ‘फ्लेचर पटेल या फोटोत दिसत आहे, त्यासोबत दिसत असलेल्या महिलेला तो ‘माय लेडी डॉन’ असे म्हणतो. कोण आहे ‘लेडी डॉन’?, असे म्हटले आहे.

कोण आहे फ्लेचर पटेल? त्याचे एनसीबीशी काय संबंध आहेत? सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू. , असेही दुसरे ट्विट मलिक यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.