Devednra Fadanvis : संजय राऊत, नाना पटोले बोलघेवडे; देवेंद्र फडणवीस यांनी घेतला समाचार 

मंत्रिमंडाचा विस्तार झाल्यानंतर राज्यातील सरकार पडेल, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.

97

महाविकास आघाडीमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असतात. त्यांच्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंसह विरोधकांवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत आणि नाना पटोले हे बोलघेवडे असून आम्हाला खूप काम आहे, त्यामुळे त्यांना उत्तर देत नाही अशी टीका फडणवीसांनी केली.

मंत्रिमंडाचा विस्तार झाल्यानंतर राज्यातील सरकार पडेल, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. यावर बोलताना फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षांवर अर्थात राऊत आणि पटोलेंवर निशाणा साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपमध्ये समन्वय असून आमच्यात कोणतीही अडचण नाही. गजानन कीर्तीकर यांनी २२ जागांवर दावा केला नसून आमच्या युतीत कोणतेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तर संजय राऊतांच्या प्रश्नावर बोलताना कोण संजय राऊत?, अशा शब्दांत फडणवीसांनी बोचरी टीका केली. महाविकास आघाडीमध्ये काहीही झाले तरी त्याचे खापर भाजपवर फोडले जाते, इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्यात आमचा हात आहे असे म्हणू नये म्हणजे झाले, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.

(हेही वाचा CM’s office Fraud : ‘हॅलो, मी सीएम कार्यालयातून बोलतोय’ – मुख्यमंत्री पदाच्या नावाचा वापर करून शैक्षणिक संस्थांना गंडवणाऱ्याला अटक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.