CM’s office Fraud : ‘हॅलो, मी सीएम कार्यालयातून बोलतोय’ – मुख्यमंत्री पदाच्या नावाचा वापर करून शैक्षणिक संस्थांना गंडवणाऱ्याला अटक

ही गंभीर स्वरुपाची बाब असल्याने पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी चिंचवड यांना तात्काळ कठोर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

112
CM's office Fraud : 'हॅलो मी सीएम कार्यालयातून बोलतोय' - मुख्यमंत्री पदाच्या नावाचा वापर करून शैक्षणिक संस्थांना गंडवणाऱ्याला अटक

काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नावाचा गैरवापर करून अनेक आमदारांना गंडा (CM’s office Fraud) घालणाऱ्या नुकताच अटक करण्यात आली. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा असा प्रकार घडला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बोलतोय असं सांगून नामांकित महाविद्यालयात विद्यार्थांना प्रवेश मिळवून देणाऱ्या भामट्याचा (CM’s office Fraud) पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील लिपिकाने हिंजवडी पोलिसांत तशी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवडमधील राहुल राजेंद्र पालांडेला अटक करण्यात आली आहे. तो युवा सेनेचा कार्यकर्ता असून त्याने स्वतःच्या व्हाट्सअँपवर सीएमओ ऑफिसचे बनावट लोगो, सीएम ऑफिसचे प्रोफाईल, बनावट मेल आयडी आणि गुगल लोकेशन ही टाकले होते. सोबतच ट्रूकॉलरला ही सीएमओ ऑफिसचा उल्लेख केला.

(हेही वाचा – Fraud : मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक्निकल सगळ्या बाबी चांगल्या ठेवून तो मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आहे, असं विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या संस्थेला (CM’s office Fraud) भासवायचा. सिम्बायोसिस आणि डी वाय पाटील महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे अनेकांच्या विश्वासाला तडा गेला.

आरोपी (CM’s office Fraud) राहुल राजेंद्र पालांडे (वय ३९ वर्षे) याच्या विरोधात कलम ४१७, ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७२, ४८४, ४८८, १७०, १७१ सह आय टी अॅक्ट ६६ (सी) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही पहा – 

ही गंभीर स्वरुपाची बाब असल्याने पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी चिंचवड यांना तात्काळ कठोर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आरोपीला तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करुन तात्काळ शिताफीने अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने (दि. २९) पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट ४ हे करत आहेत. (CM’s office Fraud)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.