वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसशी संबंध तोडून दाखवा; आमदार फरांदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

80

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून वीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावी; असे आव्हान आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक येथे दिले.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, टाकावी असेही आमदार देवयानी फरांदे यांनी नमूद केले.

(हेही वाचा सुवर्ण मंदिराची पुन्हा एकदा चर्चा; जर्नेलसिंग भिंद्रनवालेनंतर आता अमृतपाल सिंग )

३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्चपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.