Veer Savarkar यांच्या अवमानप्रकरणी राहुल गांधींच्या इंग्लंड दौऱ्याचा तपशील सादर करण्याची मागणी

जर न्यायालयाने हा अर्ज स्वीकारला तर या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचाही सहभाग होईल, असे वकील संग्राम कोल्हटकर म्हणाले. (Veer Savarkar)

316

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याविरोधात वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर पुण्यातील आमदार/खासदार विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या याचिकेच्या सुनावणीत याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी घेण्यात आली. आता सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यामध्ये राहुल गांधी यांनी ज्या इंग्लंड दौऱ्यात वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अवमान केला, त्या दौऱ्याचा सविस्तर तपशील सादर करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री, परराष्ट्र मंत्रालय यांचाकडे केली.

(हेही वाचा इराण युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्था होणार उद्ध्वस्त; IMF ने दिला इशारा)

या अर्जात असे म्हटले की, याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी ज्या इंग्लंड दौऱ्यावर असताना त्यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अवमान केला. त्याविषयीची माहिती यूट्यूबवरून मिळवली, तसेच अग्रगण्य वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या त्याविषयीच्या वृत्तांचा संदर्भ देण्यात आला आहे. पण तरीही प्रस्तुत तक्रारीच्या निष्पक्ष, संपूर्ण आणि योग्य न्यायनिवाड्यासाठी राहुल गांधी यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अवमान केलेला कार्यक्रम कोणता होता, कुठे होता, यासाठी राहुल गांधी कधी इंग्लंडला गेले होते, त्यांचा ०५/०३/२०२३ या कालावधीतील इमिग्रेशन तपशील, व्हिसा तपशील आणि प्रवासाचा तपशील, त्यांचे प्रस्थान/आगमन यासंदर्भातील तपशील केंद्रीय गृहमंत्रालयाने उपलब्ध करून द्यावा, तसेच यासाठी राहुल गांधी यांचा व्हिसा तपशील, प्रवास परवानग्या तसेच राहुल गांधी यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची नोंद ठेवणारे इतर कोणतेही सक्षम प्राधिकरण किंवा एजन्सी यांच्याविषयीच्या तपशील परराष्ट्र मंत्रालयाने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अर्जात केली आहे. यावर आता विशेष न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयात यावर अर्जावर निर्णय घेणार आहे, जर न्यायालयाने हा अर्ज स्वीकारला तर या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचाही सहभाग होईल, असे वकील संग्राम कोल्हटकर म्हणाले. (Veer Savarkar)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.