कोरोना सेंटर उभारणीत शिवसेनेचा भ्रष्ट्राचार, महापौरांकडून कार्यालयाचा दुरुपयोग

135

राज्यासह मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोना रुग्णांसाठी मुंबईमध्ये कोरोना सेंटर उभारण्यात आली आहेत. मात्र याच कोरोना सेंटरच्या नावाखाली शिवसेनेने भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांनी केला आहे.

महापौरांकडून कार्यालयाचा दुरुपयोग

मुंबईममध्ये कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात आला असून, कोरोना सेंटरच्या कंत्राटामधला भ्रष्टाचार मनसेने चव्हाट्यावर आणला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या कार्यालयाचा दुरुपयोग करुन स्वत: च्या मुलाला कोरोना संदर्भातली कंत्राटे दिली आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. राजकारण करु नका, भ्रष्टाचार करा असे जर शिवसेनेला म्हणायचे असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला विरोध करणार असे मनसेकडून सांगण्यात आले आहे.

महापौरांच्या राजीनाम्याची मागणी

एका ठिकाणी लोकांची सेवा करण्याचे नाटक करायचे, आणि दुसऱ्या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा, आपल्या लोकांना मागच्या दारांनी कामे मिळवून द्यायची. त्यातून महानगर पालिकेचे पैसे लाटायचे,” या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारुन महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील मनसेने केली आहे.

पोल खोल COVID च्या नावावर झोल झोल..#पत्रकार_परिषद

Posted by Sandeep Deshpande Adhikrut on Wednesday, August 19, 2020

महापौरांच्या मुलाचाही समावेश

किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कोणताही अनुभव नसताना कोरोना सेंटर उभारणीची कामे देण्यात आली. शैला प्रशांत गवस, गिरिश रमेश रेवणेकर, प्रशांत महेश गवस, साईप्रसाद किशोर पेडणेकर अशी संचालक पदी असलेल्यांची नावे आहेत. कोरोनाच्या काळात पालिकेने कोरोना सेंटर उभारणीसाठी पैसा उपलब्ध करुन दिला, हे पैसै आणि कामे शिवसेनेने आपआपसात वाटून घेतली, असा आरोप मनसेने केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.