T. Raja Singh : हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन; तेलंगाणाचे आमदार टी. राजा सिंह

Hindu Rashtra : टी. राजा सिंह तेलंगणातील गोशामहल या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नुकतीच त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे.

215
T. Raja Singh : हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन; तेलंगाणाचे आमदार टी. राजा सिंह
T. Raja Singh : हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन; तेलंगाणाचे आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील गोशामहल मतदारसंघातून तिसर्‍यांदा निवडून आलेले भाजपचे (BJP) आमदार टी. राजा सिंह (T. Raja Singh) यांनी ४ डिसेंबर २०२३ या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील आणि देशातील विभिन्न भागांतील त्यांच्या सर्व समर्थकांचे आभार मानले आहेत.

ते म्हणाले, ‘‘मी हा विजय संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदु समाजाला देतो. मी हिंदु असल्याने हिंदुत्वावर बोलत राहीन. हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन.’’ (Hindu Rashtra)

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : इंदिरा गांधींची बांगलादेशी घुसखोरांप्रती दया आणि देशाला आर्थिक बोजा)

‘तेलंगाणाच्या (Telangana) अत्यंत प्रतिकूल वातावरणातही प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते आणि भाजपचे उमेदवार टी. राजा सिंह हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यांना ८० सहस्र १८२ मते मिळाली असून बी.आर्.एस्. (BRS) च्या उमेदवाराला ५८ सहस्र ७२५ मते, तर काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराला केवळ ६ सहस्र २६५ मतांवर समाधान मानावे लागले.

कोण आहेत टी. राजा सिंह

टी. राजा सिंह (T. Raja Singh) तेलंगणातील गोशामहल या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नुकतीच त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. ते राजाभैया किंवा टायगर भैया या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा मतदारसंघ आणि हैदराबाद परिसरात ते लोकप्रिय आहेत. कट्टर गोरक्षक ही त्यांची ओळख आहे. बजरंग दलाचे सदस्य असलेले सिंह २००९ साली राजकारणात उतरले.

(हेही वाचा – Indonesia Volcano Eruption : इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; २२ गिर्यारोहक ठार)

मंगलहाट या ठिकाणाहून तेलुगू देसम पक्षाचे नगरसेवक या पदापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करीत गोशामहल (Goshamahal) या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवून काँग्रेसकडून हा मतदारसंघ खेचून घेतला. गेल्या १० वर्षांपासून हा मतदारसंघ राजा सिंह  (T. Raja Singh) यांच्याकडे आहे. भाग्यनगरसारख्या ओवैसी यांच्या बालेकिल्ल्यात राहून ते प्रखर हिंदुत्वाची बाजू लावून धरतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.