काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

108

त्रासाला कंटाळून काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या भावानं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात रविवारी ही घटना घडली. स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं असून विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिजनांना ‘गूड बाय’ असा टेक्स मॅसेज देखील केला होता.

नक्की काय घडलं?

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. चंद्रशेखर उर्फ हनमंतराव पाटील चाकूरकर असं त्यांचं नाव आहे. ते ८१ वर्षाचे होते. लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात ते राहत होते. ते शेती करून आपली उपजिवीका भागवत होते. सकाळी घराबाहेर फिरायला जाण्याचा त्यांचा नित्यक्रम असायचा. फिरून आल्यानंतर ते स्वत:च्या घरी जाण्याआधी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी फेरफटका मारायला जात असत. तिथे चहा पाणी झाल्यावर त्यांच्या घरी पेपर वाचत बसत. बऱ्याच वर्षांपासून त्यांचा हा दिनक्रम असायचा. बराच वेळ शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी घालवल्यानंतर मगच ते आपल्या घरी परतायचे.

नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ते आपल्या चुलत भाऊ शिवराज यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर शैलेश पाटील यांनी त्यांना चहा घ्या मी आवरुन येतो असं सांगून निघून गेले. काही वेळानं गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे घरातील नोकर आणि शैलेश पाटील धावत हॉलमध्ये आले. त्यावेळी त्यांना चंद्रशेखर हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.

आजारपणाला कंटाळले 

माहितीनुसार, चंद्रशेखर यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली आहेत. या सर्वांची लग्न झाली आहेत. चंद्रशेखर हे एका मुलासोबत चाकूरकर यांच्या घराच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये राहत होते. वयोमानानुसार त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या. ते सततच्या आजारपणाला कंटाळले होते. त्यातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज चंद्रशेखर यांचे चिरंजीव ॲड. लिंगराज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – भाजपमध्ये आलेल्या कोणाची चौकशी बंद झाली ते दाखवा – देवेंद्र फडणवीस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.