Congress नेते संजय निरुपम शिवसेनेच्या (शिंदे) वाटेवर?

Sanjay Nirupam यांची कॉँग्रेसवर टीका, मोदींबाबत भूमिका नरमली

173
Congress नेते संजय निरुपम शिवसेनेच्या (शिंदे) वाटेवर?
Congress नेते संजय निरुपम शिवसेनेच्या (शिंदे) वाटेवर?

कॉँग्रेस नेते, माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी कॉँग्रेस पक्ष (Congress) सोडण्याची पूर्ण मानसिक तयारी केली असल्याचे त्यांच्या विविध वकतव्यांवरून दिसून येत आहे. त्याचबरोबर निरुपम यांचा शिवसेना (शिंदे) (Shivsena (Shinde)) गटाकडे अधिक कल असून भाजपा हादेखील एक पर्याय असल्याचे त्यांच्या अलीकडच्या वकतव्यांवरून जाणवते. (Congress)

(हेही वाचा- Palghar Lok Sabha Constituency : उबाठा शिवसेनेकडून पालघरमधून माजी आमदाराला उतरवणार निवडणुकीत?)

कॉँग्रेसला काही फरक पडत नाही

“आपण कॉँग्रेस सोडणार म्हटल्यावरही पक्षातील एकाही नेत्याने विचारणा केली नाही, चर्चा केली नाही आणि कुणाला काही फरक पडत नाही,” असे निरुपम म्हणाले. मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदार संघासाठी इच्छुक असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली, मात्र पक्षाने कच खाल्ली आणि ही जागा शिवसेना उबाठाला सोडून दिली,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Congress)

शिवसेना (शिंदे) एक पर्याय

निरुपम यांनी भविष्यातील वाटचालीबद्दल उघड मत व्यक्त केले नाही मात्र त्यांनी ‘शिवसेना (शिंदे) (Shivsena (Shinde)) पक्षात जाणारच नाही का?’, या प्रश्नावर ‘असे काही नाही’ सांगून शिवसेना (शिंदे) हादेखील एक पर्याय असून शकतो असे स्पष्ट केले. (Congress)

(हेही वाचा- Oshiwara River : पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यानाची भिंत केली ओशिवरा नदीने कमजोर)

मोदी भूमिकेवर निरुपम नरमले

निरुपम (Sanjay Nirupam) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कॉँग्रेस पक्षावर (Congress) टीका करत मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यपद्धतीवर नेहमीच्या कॉँग्रेस (Congress) भूमिकेशी सुसंगत नाही, तर ‘सॉफ्ट’ भूमिका घेतली. कॉँग्रेस पक्षाच्या (Congress) भूमिकेला छेद देत, निरुपम यांनी मोदी यांच्या कार्यपद्धतीचे एकप्रकारे समर्थन करत कॉँग्रेसने सत्तेचा दुरुपयोग केला नाही का? असा सवाल केला. “जर मोदी ‘डीक्टेटर’ झाले असं म्हणता तर लोक त्यांना एकढी पसंती का देतात? तीन गोष्टींचा भाव कायम वाढत आहे. सोन्याचा भाव, मुलींचे वय आणि मोदींची लोकप्रियता,” असेही त्यांनी गंमतीने म्हटले. १० वर्षे झाली मोदी सरकार सत्तेत आहे, पण अजून सरकारविरोधी वातावरण दिसत नाही. त्यांची धोरणे चुकली तर आम्ही (कॉँग्रेस) काय आंदोलन केले? फक्त समाजमाध्यमावर?” असा प्रश्न त्यांनी केला.  (Congress)

कॉँग्रेस पक्षाची बांधणी विस्कटलेली

कॉँग्रेस पक्षाची (Congress) बांधणी विस्कटलेली असल्याचे सांगत याची काळजी कुठल्याही कॉँग्रेस नेत्याला नाही. “कुणाचा कशाला पायपोस नाही. राज्यात शिवसेना उबाठासोबत युती करून पक्षाने आपली जबाबदारी ढकलली असून कॉँग्रेस पक्ष उबाठाला जसे ‘आउटसोर्स’ केला आहे,” अशा शब्दात त्यांनी पक्षाची स्थिति असल्याचे म्हटले. (Congress)

(हेही वाचा- Cash For Query : महुआ मोईत्राविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल; तृणमूलला धक्का)

इंडि आघाडी म्हणजे एक फार्स

कॉँग्रेसवर (Congress) नेतृत्वाखालील इंडि आघाडीवरही (India Aghadi) त्यांनी टीका केली. “इंडि आघाडी म्हणजे एक फार्स आहे. कॉँग्रेसने एकीकडे आम आदमी पक्षाशी युती केली तर आप नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक झाली त्याबद्दल दिल्लीत जाऊन सहानुभूति व्यक्त केली तर पंजाबमध्ये कॉँग्रेसचे लोक पेढे वाटत होते. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टशी आघाडी करता आणि केरळमध्ये विरोधात लढता. त्यामुळे हा फार्स आहे, असे वाटते. देशाचा मतदार हे सगळं बघतो आणि निरीक्षण करतो,” अशी पुष्ती त्यांनी जोडली. (Congress)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.